◻️ दैव बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला
◻️ वीज कोसळल्याचा विडोओ झाला तुफान वायरल
◻️ एकाचं आठवड्यातील आश्वी पंचक्रोशीतील तिसरी घटना
संगमनेर LIVE | शुक्रवारी सांयकाळी आलेल्या अवकाळी पावसामुळे संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथिल पोलीस पाटील विठ्ठल यादव आंधळे यांच्या शेतातील दोन नारळीच्या झाडावर वीज कोसळली होती. या दोन झाडापासून अवघ्या काही अतंरावर आंधळे यांचे घर व जनावराचा गोठा असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रतापपूर शिवारातील गट नंबर ६३ मध्ये विठ्ठल आंधळे याची वस्ती व जनावराचा गोठा आहे. शुक्रवारी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रतापपूर सह परिसरात अवकाळी पाऊस सुरू झाला होता. वीजाचा कडकडाट सुरु होताचं विठ्ठल आंधळे यांच्या शेतातील दोन नारळाच्या झाडावर मोठा आवाज करत वीज कोसळल्यामुळे या दोन्ही झाडानी पेट घेतला होता. यावेळी झाडापासून काही अतंरावर आंधळे यांची वस्ती व जनावराचा गोठा असून या गोठ्यात लहान - मोठे असे १५ जनावरे तसेच आंधळे यांचे संपूर्ण कुटुंब यावेळी याठिकाणी उपस्थित होते.
दरम्यान मोठा अनर्थ टळल्याने प्रतापपूर सह परिसरातील नागरीकानी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी वीज पडल्याचा विडीओ आश्वी सह पंचक्रोशीत चागलाचं वायरल झाला आहे.
एकाचं आठवड्यातील आश्वी पंचक्रोशीतील तिसरी घटना
आश्वी सह परिसरात अवकाळी पावसामुळे नारळाच्या झाडावर वीज कोसळण्याच्या घटनामध्ये वाढ झाली असून एकाचं आठवड्यात आश्वी खुर्द, कणकापूर व प्रतापपूर या ठिकाणी नारळाच्या झाडावर वीज कोसळल्यामुळे शेतकऱ्यासह नागरीकानमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.