◻️ रयतच्या आश्वी इंग्लिश स्कूलच्या १९७९ च्या बँचच्या माजी विद्यार्थ्याचा सस्नेहं मेळावा उत्सहात संपन्न
◻️ माजी विद्यार्थ्यानी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा
संगमनेर LIVE (योगेश रातडीया) | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इंग्लिश स्कूलच्या १९७९ सालच्या १० वीच्या बँचचे माजी विद्यार्थ्यी मेळाव्यासाठी तब्बल ४४ वर्षानी एकत्र आले होते.
यावेळी शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यावरील वचक, शाळेतील विविध स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते.
१९७९-१९८० साली शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा नुकताच आश्वी बुद्रुक येथिल रयत संकुलात आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेत शिक्षण घेतलेले अनेक माजी विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. तर शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यामुळे सर्वाचे गुलाबाचे फूल देऊन विद्यालयाचे प्राचार्य जनार्दन बर्डे, राजेंद्र शहाणे यांनी स्वागत केले.
त्यावेळी या विद्यार्थ्याना शिकवणारे शिक्षक कैलास पटणी, झावरे, झावरे मॅडम, शिरसाठ उपस्थित होते. तर यावेळी शिक्षक वाकचौरे व्हिडीओ काॅल व्दारे विद्याथ्यांशी हितगुज केले. याकार्यक्रमाचे नियोजन माजी उपसंचालक भुमी अभिलेख किशोर तवरेज, बाळासाहेब दिघे, माजी प्राचार्य बाळासाहेब उंबरकर, उद्योजक राजेंद्र रातडीया, आण्णासाहेब ताजणे, दिनकर आंधळे, राधाकृष्ण आंधळे, रुपचंद आव्हाड, भाऊसाहेब शिंदे, काशिनाथ उंबरकर, हौशिराम माळवदे, दिगंबर केदार, सतिष गांधी, शामलाल गांधी, जयंत्तीलाल भंडारी, लक्ष्मण घुगे, शंकर निघुते, सुधाकर शिंदे, रामनाथ जऱ्हाड, नानासाहेब देशमुख, सुनिल सांबरे, अशोक गायकवाड, संपत ताजणे, वेणुनाथ गायकवाड, तारा निघुते, विठ्ठल आंधळे, शिवदास खामकर, मोहिनी जगताप, सविता गांधी, जयश्री गांधी, गट शिक्षण विस्तार अधिकारी मंदा दुरगुडे, रुखमीनी गायकवाड, तारा खेमनर, कमल खेमनर, आशा आंधळे, बेबी मदने आदि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी विद्यार्थ्यानी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात जे यश मिळवले त्यामागे शाळेचे संस्कार व शिक्षकाची शिस्त असल्याची भावना यावेळी व्यक्त केल्या. याप्रसंगी शाळेतील सुमारे शंभर गरीब व गरजु विद्यार्थ्याची शालेय फी भरुन आपल सामाजिक दायित्व पुर्ण केले. तसेच विद्यालयातील इयत्ता ९ वी व१० वी तील गरजु विद्याथ्यांना पुस्तक संच देण्याचा माणस व्यक्त केला आहे.