संगमनेर बाजार समितीवर माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व

संगमनेर Live
0
 ◻️ ना. विखे पाटील यांचे जनसेवा मंडळ भुईसपाट

◻️ १८ पैकी १८ जागावर शेतकरी मंडळाचा विजय


संगमनेर LIVE | राज्यात अत्यंत प्रगतशील व महत्त्वाच्या असलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी निर्विवाद वर्चस्व राखले असून शेतकरी विकास मंडळाच्या १८ पैकी १८ जागावर मोठ्या मताधिक्याने विजय झाला असून भाजप प्रणित व विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाच्या उमेदवाराना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

राज्याचे माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा विकासात पुढे असून सर्व सहकारी संस्था या देशासाठी आदर्शवत ठरल्या आहेत. संगमनेरच्या सहकार पॅटर्न हा राज्याला मार्गदर्शक असून आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील मोठी व शेतकऱ्यांसाठी सुख सुविधा देणारी अद्यावत बाजार समिती म्हणून ओळखली जाते. या बाजार समितीवर कांग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे एक हाती यांची वर्चस्व राहिले असून गेली अनेक वर्ष या बाजार समितीच्या निवडणुका बिनविरोध होत होत्या.

मात्र यावर्षी झालेल्या निवडणुकीत संगमनेर तालुक्यातील मतदारांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेतकरी विकास मंडळाच्या १८ पैकी १८ उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करत विरोधी पॅनल चा धुव्वा उडवला आहे.

सोसायटी मतदारसंघातून विद्यमान सभापती शंकरराव हनुमंता खेमनर, कान्हेरे सुरेश रामचंद्र, खताळ सतीश विश्वनाथ, गायकवाड गीताराम दशरथ, गोपाळे मनीष सूर्यभान, पानसरे कैलास बाळासाहेब, सातपुते विजय विठ्ठल हे निवडून आले आहे. महिला राखीव मतदार संघातून सौ. वर्पे  दिपाली भाऊसाहेब व सौ. साकोरे रुक्मिणी शिवाजी या विजयी झाल्या आहेत. इतर मागासवर्गीय मतदार संघातून ताजने सुधाकर पुंजाजी तर भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघातून घुगे अनिल शिवाजी हे विजयी झाले आहेत. व्यापारी मतदारसंघातून भंडारी मनसुख शंकर व शेख निसार गुलाब हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातून वाघ अरुण तुळशीराम, शरमाळे सखाहारी बबन, खरात संजय दादा, कडलग निलेश बबन हे विजयी झाले आहेत. मैत्रीपूर्ण लढत झालेल्या हमाल मापाडी मतदारसंघातून कर्पे सचिन बाळकृष्ण हे विजयी झाले आहेत

या सर्व विजयी उमेदवारांचा काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी मा. आ. डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीत थोरात, बाबा ओहोळ, मिलिंद कानवडे, विश्वासराव मुर्तडक, शिवसेनेचे संजय फड यांचे सह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मा. आ. डॉ. तांबे म्हणाले की आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा सहकार हा राज्याला आदर्शवत आहे. येथील सहकारामुळे ग्रामीण समृद्धी निर्माण झाली असून जनतेचा आमदार थोरात यांच्या नेतृत्वावर सार्थ विश्वास आहे. मात्र फक्त त्रास द्यायचा म्हणून काही लोकांनी ही निवडणूक लागली होती. मात्र संगमनेर तालुक्यातील सुज्ञ मतदारांनी बाह्य शक्तींना व तालुक्याच्या विकासात अडथळे निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना रोखले आहे

कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, सुसंस्कृत राजकारण ही संगमनेर तालुक्याची परंपरा आहे. निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी आमदार थोरात यांच्या नेतृत्वावर सार्थ विश्वास दाखवला असून राज्यातही सर्व जनता ही महाविकास आघाडी सोबत आहे.

दरम्यान यावेळी यशोधन परिसरात ढोल ताशांचा गजर व गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी विजयी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत केले.

जनतेने खबऱ्यांचा बंदोबस्त केला..

राज्यात विकासातून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर तालुक्याच्या विकासात अडथळे निर्माण करण्यासाठी काही खबरे काम करत आहेत. मात्र या निवडणुकीत सुज्ञ मतदारांनी खाबर्‍यांचा पूर्ण बंदोबस्त करताना सर्वाना धोबीपछाड दिला असल्याचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे यांनी म्हटले आहे.

अपक्ष सचिन कर्पे यांचा शेतकरी विकास मंडळास पाठिंबा

मैत्रीपूर्ण झालेल्या हमाल मापाडी मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते बाळकृष्ण कर्पे व विजयी उमेदवार सचिन बाळकृष्ण कर्पे यांनी विजय होताच नामदार बाळासाहेब थोरात यांच्या विजयाच्या घोषणा देत शेतकरी विकास मंडळाला संपूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर करून यापुढेही त्यांच्या नेतृत्वाखालीच काम करणार असल्याचे म्हटले आहे.

संगमनेरात व सोशल मीडियावर आ. बाळासाहेब थोरात यांची धूम..

संगमनेर बाजार समितीत आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्वच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याने सर्वत्र समाज माध्यमांवर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या जय जय कारासह ये बंदा लय जोरात बाळासाहेब थोरात याच गाण्याची धूम होती.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !