◻️ लोणी येथिल उन्हाळी शिबीराचा समारोप
संगमनेर LIVE | (लोणी) | आदर्श नागरीक घडविणे हाच प्रवरेचा मुख्य हेतू आहे. शिक्षण क्षेत्रात काम करतांना प्रवरा ही आपली पालक म्हणून सदैव सोबत असते. मुलांना योग्य पध्दतीचे ज्ञान आणि संस्कार हे उन्हाळी शिबीरांच्या माध्यमातून दिल्याने ही मुले भविष्यात आदर्श नागरीक घडतील असे प्रतिपादन जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा आणि लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विश्वस्त सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
गुणवत्ता पुर्ण शिक्षणांसोबतचं मागील बारा वर्षापासून प्रवरेच्या लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शाखांच्या सहभागातून आणि संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या उन्हाळी शिबीरांच्या समारोप प्रसंगी सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे ध्रुव पाटील विखे, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, प्राचार्या भारती देशमुख, प्राचार्या रोजमीन बेलीम, प्रा. प्रिती भुतडा, प्रा. रेखा रत्नपारखी, प्रा. अनिता घोगरे यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
प्रवरा सेट्रल पब्लीक स्कूल, प्रवरानगर आणि प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कुल, लोणी येथे आयोजित केलेल्या शिबिरास महाराष्ट्रातील पुणे, जालना, बुलढाणा,अहमदनगर इत्यादी ठिकाणांहून विद्यार्थी आले होते. दहा दिवसीय शिबिरात विद्यार्थ्यांना विविध मैदानी खेळ, मनोरंजनात्मक खेळ, कथा सादरीकरण, रायफल शूटींग, धनुर्विद्या, घोडे सवारी, योगा, कराटे, मातीच्या वस्तू बनवणे, संगीत गायन, अग्निविरहित पाककला, गिर्यारोहण, श्लोक पठण, महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची माहिती तसेच रोबोटिक्स व कोडिंग अशा विविध उपक्रमांचे आयोजन करुन मुलांचे व्यक्तीमत्व घडवीले.
शिबीराचा समारोप कार्यक्रमात पुणे येथून दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक बापुसाहेब अनाप, सौ. रोहीणी बांडे यांनी शिबीर आयोजन समितीचे भरभरून कौतुक केले. तसेच अशी शिबिरे भविष्यात देखील व्हावी अशी इच्छा नगर येथून दाखल झालेल्या विद्यार्थ्याच्या आईने व्यक्त केली. समारोप कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले.
दरम्यान य कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारती देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रभंजन भगत, अरुण बोधक यांनी तर आभार रोजमीन बेलीम यांनी केले.