◻️ आवघ्या २४ व्या वर्षी तरुणावर काळाचा घाला
◻️ उंबरी बाळापूर सह आश्वी पंचक्रोशीत शोककळा
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथिल रहिवासी असलेला आदित्य सोमनाथ उंबरकर (वय - २४) यांचे सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भिषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. त्यामुळे उंबरी बाळापूर सह पंचक्रोशीत समाजमाध्यमात आदित्यला मोठ्या प्रमाणात श्रध्दांजली वाहण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आदित्य सोमनाथ उंबरकर हा उच्च शिक्षित तरुण होता. तो घोटी येथिल रुग्णालयात कार्यरत होता. नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावरून सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास आदित्य घोटीच्या दिशेने चालला होता.
यावेळी सिन्नर तालुक्यातील बेल्हू फाट्याजवळ समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या आदित्यला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र अपघात इतका भिषण होता की, उपचारापूर्वीच या तरुणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.
आदित्यच्या पश्चात आई, वडील, भाऊ, चुलता, चुलती, आजी व आजोबा असा मोठा परिवार असून सोमनाथ उंबरकर याचा मुलगा, रामनाथ उंबरकर यांचा तो पुतण्या तर सचिन उंबरकर यांचा तो मोठा भाऊ होता.
दरम्यान मंगळवारी सकाळी उंबरी बाळापूर येथिल स्मशानभूमी वर शोकाकूल वातावरणात अत्यंसंस्कार पार पडले असून यावेळी श्रध्दांजली देण्यासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.