◻️ प्रवरा गर्ल्स इंग्लिश स्कुलच्या ६३ पैकी ६३ मुली उत्तीर्ण
◻️ विशेष प्रावीण्य ६, प्रथम श्रेणी ३६, द्वितीय श्रेणीत २३ मुलींची बाजी
संगमनेर LIVE (लोणी) | लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कुल आणि ज्युनिअर महाविद्यालय लोणीचा बारावी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून विशेष प्रावीण्य ६, प्रथम श्रेणी ३६, द्वितीय श्रेणीत २३ मुलींनी बाजी मारली अशी माहीती प्राचार्या भारती देशमुख यांनी दिली.
प्रवरा गर्ल्स इंग्लिश स्कुलने आपली गुणवत्ता कायम ठेऊन ६३ पैकी ६३ मुली उत्तीर्ण झाल्या. यामध्ये कु. दिपाली कैलास पवार ८५.१७ टक्के गुण मिळत प्रथम, कु. तन्वी सचिन काकड ७९.१७ टक्के गुण मिळवत द्वितीय तर कु यशश्री राहुल दिघे ७७ टक्के गुण मिळूम तृतीय आली आहे.
दरम्यान यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डाॅ. राजेंद्र विखे पाटील, सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिकचे संचालक डाॅ. प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, शिक्षण समन्वयक प्रा. नंदकुमार दळे यांनी आभिनंदन केले.