◻️ आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
◻️ वर्दळीच्या ठिकाणाहून राज्य परिवहन मंडळाच्या दोन उभ्या एसटी बसमध्ये चोरी झाल्याने मोठी खळबळ
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथिल बस स्थानकावर उभ्या असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या संगमनेर आगारातील दोन एसटी बस मधून अंदाजे १९ हजार ४५९ रुपये किमंतीचे २२० लिटर डिझेल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत एसटी चालक दिपक कदम यानी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. ७ मे रोजी रात्री आश्वी बुद्रुक येथिल एसटी थांब्यावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या दोन एसटी बस मुकामी होत्या. मध्यरात्री एम. एच. १४ बीटी. ११४७ या एसटीतुन १० हजार ६१४ रुपये किमंतीचे १२० लिटर डिझेल तसेच एम. एच. ०७ सी. ९२५० या एसटीतून ८ हजार ८४५ रुपये किमंतीचे १०० लिटर डिझेल अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. यावेळी चोरट्यानी डिझेल टाकीचे झाकणे आत दाबून कड्या फाकवून डिझेल चोरुन नेले असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान आश्वी पोलीस ठाण्यात गुरंव नबंर १०९/२०२३ नुसार भादंवी कलम ३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरिक्षक भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ आर. डी. पारधी हे पुढील तपास करत आहे.