लोकांच्या समस्या जाणून घेत शक्य ती मदत करण्यातचं आनंद - आ. सत्यजीत तांबे

संगमनेर Live
0
◻️ आमदार सत्यजीत तांबेची स्वारी, मतदारांच्या दारी

◻️ न थकता करतात दररोज ५०० ते ६०० किमीचा प्रवास

संगमनेर LIVE | निवडणुकीत विजयी झाल्यानंतर निवडून आलेले लोकप्रतिनिधी जनतेच्या दरबारात पुन्हा पाऊल कधी ठेवणार यासाठी मतदारांना चातकासारखी वाट पहावी लागते. मात्र, आमदार सत्यजीत तांबे हे याला अपवाद ठरले असून निवडून आल्यानंतरदेखील मतदारांचे आभार मानण्यासाठी ते आजही संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे त्याचबरोबर यामाध्यमातून मतदारांसोबत जनसंपर्क वाढवण्यासह मतदारसंघातील प्रश्न जाणून घेत ते सोडविण्याचा प्रयत्न आमदार तांबे यांच्याकडून केला जात आहे.

निवडणूकीच्या काळात एकूण १२० संघटनांनी सत्यजीत तांबे यांना आपला बिनशर्त पाठींबा दर्शवीला होता. यात विविध शिक्षक संघटना, आरोग्य संघटना व युनियन्स यांचा समावेश होता. तांबे यांना पाठींबा देत असताना त्यांनी आपल्या विविध समस्या, प्रश्न व मागण्या मांडल्या होत्या. त्याअनुषंगाने आमदार सत्यजीत तांबे संबंधितांच्या भेटी घेत आहेत. याशिवाय, तांबे यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी दररोज सर्वसामान्य व विविध क्षेत्रातील लोक त्यांचे प्रलंबित प्रश्न घेऊन येत आहेत. ते प्रश्नदेखील सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून केला जात आहे.

विशेष म्हणजे निवडून आल्यानंतर आमदार तांबे यांनी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. लोकांच्या सेवेसाठी तत्पर असणारे आमदार सत्यजीत तांबे दर दोन आठवड्यांतून एकदा विविध लोकोपयोगी कामांसंदर्भात संबंधीत मंत्र्यांची भेट घेण्यासाठी आणि इतर शासकीय कामांसाठी मुंबईत येत असतात. परिणामी कामांचा पाठपुरावा होत असल्याने जनतेचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील असा विश्वास त्यांना आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघ हा नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार व नगर या पाच जिल्ह्यांत विभागला गेला आहे. यामध्ये एकूण ५४ तालुके व ४००० गावांचा समावेश आहे. भला मोठा विस्तार असलेल्या या मतदारसंघात निवडून आल्यापासून मुंबई व संगमनेरचा मुक्काम सोडला तर दररोज सरासरी ५०० - ६०० किमी इतका प्रवास करूनही थकण्यापेक्षा मला ऊर्जाच मिळत असल्याची भावना आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली आहे.

एकदा निवडणूक झाली की लोकप्रतिनिधी मतदारसंघात दिसणे तसे फार दुर्मिळ असते. लोकप्रतिनिधींकडे काही काम असेल तर तालुक्याच्या किंवा शहराच्या ठिकाणी असलेल्या त्यांच्या कार्यालयात मतदारांना चकरा माराव्या लागतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना मोठमोठ्या प्रकल्पांच्या आणि विकासकामांच्या अपेक्षा नसून सरकारी कार्यालयात त्यांची छोटी-छोटी कामं होत नाही याचाच जास्त त्रास होत असतो. मात्र याला अपवाद ठरलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांचा हा आभार दौरा इतर सर्व लोकप्रतिनिधींसाठी एक आदर्शच म्हणावा लागेल.

जनसेवेतच आनंद!

लोकांच्या समस्या जाणून घेणे व त्यांना शक्य ती मदत करता येणे यापेक्षा दुसरा आनंद लोकप्रतिनिधींच्या आयुष्यात असूच शकत नसल्याची भावना आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्तं केली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !