गोवा येथिल ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक व गोल्ड मेडल पटकावले
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालयाचा विद्यार्थी रोहित कैलास मांढरे याची दक्षिण विभागातून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून नुकत्याच झालेल्या नॅशनल युथ स्पोर्ट्स एज्युकेशन फेडरेशन इंडियाच्या वतीने गोवा (मापुसा) येथे घेण्यात आलेल्या ४०० मीटर धावणे स्पर्धेत त्याने प्रथम क्रमांक पटकावत गोल्ड मेडल प्राप्त केल्यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या निवडीबद्दल राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, मा. मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, सौ. शालिनीताई विखे पाटील, डॉ. राजेंद्र विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, आण्णासाहेब भोसले, निवृत्ती सांगळे, जेहुर शेख, भाऊसाहेब मांढरे, आण्णासाहेब म्हस्के, तबादादा मुन्तोडे, शिवाजी मांढरे, भाऊसाहेब मुन्तोडे याचें सह डॉ. पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, आश्वी महाविद्यालयाचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. राम पवार, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. देविदास दाभाडे, डॉ. सुवर्णा जाधव तसेच महाविद्यालय विकास समिती सदस्य व सर्व प्राध्यापकासह विविध स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
यापुढील त्याची स्पर्धा दुबई येथे होणार असून महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक डॉ. प्रमोद विखे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने या स्पर्धेची तयारी केली होती. महाविद्यालयीन शिक्षण सांभाळून रोहितने आपल्यातील क्रीडागुणांना जपल्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.