◻️ मंत्री विखे पाटील यांच्याकडून सभापती, उपसभापती व संचालक मंडळाचे अभिनंदन
संगमनेर LIVE (शिर्डी) | संपूर्ण राज्यात नावलौकीक प्राप्त केलेल्या राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी ज्ञानेश्वर गंगाधर गोंदकर यांची तर उपसभापती आण्णासाहेब भाऊसाहेब कडू यांची बिनविरोध झाली आहे. राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाच्या निवडणुकीत सर्व जागांवर विजय संपादन केला आहे.
नुतन संचालक मंडळाची पहीली सभा सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीसाठी बोलाविण्यात आली होती. सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी रावसाहेब खेडकर यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रकिया पार पाडण्यात आली. यामध्ये सभापती पदासाठी व उपसभापती पदासाठी अनुक्रमे गोंदकर व कडू यांचे दोघांचे अर्ज आल्याने या दोघांची निवड बिनविरोध करण्यात आली.
यावेळी संजय पाटील, सचिव उध्दव देवकर अदिसह संचालक मंडळातील सदस्य विजय कातोरे, संतोष गोर्डे, दत्तात्रय गोरे, ज्ञानदेव चौधरी, बाबासाहेब शिरसाठ, मिना निर्मळ, रंजना लहारे, दिलीप गाडेकर, राजेंद्र धुमसे, जालिंदर गाढवे, राहुल धावणे, सुभाष गायकवाड, शांताराम जपे, सचिन कानकाटे, निलेश बावके, बाबासाहेब कांदळकर अदि उपस्थित होते. निवडीनंतर सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, व उपसभापती आण्णासाहेब कडू यांचा सत्कार करण्यात आला. तर सर्व संचालक मंडळाचा सत्कार यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी गणेश कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, संचालक मधुकर कोते, माजी संचालक दिगंबर कोते, शिवाजी गोंदकर, माजी उपसभापती वाल्मिकराव गोर्डे, माजी संचालक किरण दंडवते, ओमेश जपे कानिफ बावके, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सतीश बावके यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
राहाता बाजार समिती ना. राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात अग्रगण्य आहे. या बाजार समितीत शेतकरी हिताला महत्व दिले जात आहे. या बाजार समितीचा नावलौकिक चांगला आहे. यापुढेही आपण व आपले संचालक मंडळ बाजार समितीचा कारभार चांगलाच करेल असा विश्वास सभापती ज्ञानेश्वर गोंदकर यांनी व्यक्त केला.