◻️ महसूल मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डाॅ. प्रदिप दिघे यांचे प्रवरेत आदर्श काम
संगमनेर LIVE (लोणी) | महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहीती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी करिअर कट्टा हा महत्वपूर्ण उपक्रम सुरू आहे. या अंतर्गत विद्यार्थी संसद समितीच्या राज्य अध्यक्षपदी डाॅ. प्रदिप दिघे यांची निवड करण्यात आली असे महाराष्ट्र माहीती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र संचालक यशवंत शितोळे यांनी सांगितले.
या करिअर कट्टा अंतर्गत शैक्षणिक उपक्रमाबरोबर स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, पोलिस, बँकींग, शासकीय भरती बरोबरच, पर्यावरण शास्त्र, उद्योग उभारणी, भारतीय संविधानाचे प्रबोधन या करिअर कट्टा उपक्रमातून विद्यार्थी संसद समितीद्वारे प्रत्येक तांत्रिक आणि अतांत्रिक महाविद्यालयात राबविला जातो. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अतांत्रिक विभागाचे संचालक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदिप दिघे यांची या समितीचे राज्य अध्यक्ष पदावर निवड झाल्याने या उपक्रमाची व्याप्ती वाढले असेही शितोळे यांनी सांगितले.
राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण क्षेत्राबरोबरचं, पोलिस, तलाठी, भरती केंद्र, प्रवरा कोविंड सेंटर यामध्ये डॉ. दिघे यांनी आदर्श काम केले आहे.
आज पर्यत हे काम प्रवरेच्या शैक्षणिक संकुलामध्ये सुरुचं होते. त्याला व्यापक स्वरूप देतांनाच ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना करिअर कट्टा उपक्रमातून शासकीय सेवेबरोबरचं उद्योजकता आणि स्टार्ट अँप साठी प्रयत्न केल्या जाईल अशी प्रतिक्रिया डॉ. दिघे दिली.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डाॅ. राजेंद्र विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका डाॅ. लिलावती सरोदे यांनी अभिनंदन केले.