◻️ कॅम्पस प्लेसमेंटमधून यावर्षी ३५ विद्यार्थ्याना नोकरी
संगमनेर LIVE (लोणी) | लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण अभियांञिकीच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचे वीस विद्यार्थ्याना बहुराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली असून आजपर्यत यावर्षात शिक्षण घेत असलेल्या ३५ विद्यार्थ्याची निवड झाल्याची माहीती महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. संजय गुल्हाने यांनी दिली.
यामध्ये ऋषिकेष धायगुडे, गौरव दाते, अनिकेत चव्हाण, मयूर कोठुले, श्रीनिवास मुंडे, ओंकार पेहेरे, गणेश श्रीराम, वैभव चोर यांची के. आर. एम. कन्सल्टन्सी अहमदनगर, निलेश चौधरी, रोहित गवळी, मनोज चिंधे यांची एसएम पॉलिमर्स आणि परमहंस कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ठाणे, संकेत शेळके, अक्षय डोंगरे, हितेश शिंदे, शिवम रौंदळ, अजिंक्य पाचपुते, सौरभ गुंजाळ यांची के रहेजा कॉर्प पुणे तर हर्ष घोडेकर व अंकिता तांबे यांची टोयो इंजिनीरिंग मुंबई अशा विविध बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.
पुढे माहिती देताना त्यांनी सांगितले की, सिव्हील इंजिनिअरिंग विभागाने इंडस्ट्रीजची गरज ओळखून, महाविद्यालयातील सिव्हील इंजिनिअरिंग विभागाने विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीजमध्ये लागणारे तंत्रज्ञानात पारंगत केल्यामुळे ३५ हून अधिक विद्यार्थांना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. विभागाकडे पी.एच.डी. झालेले वरिष्ठ तज्ञ व अनुभवी प्राध्यापक आहेत. हा विभाग त्यांच्या चार वर्षांच्या अभ्यासादरम्यान उद्योग गरजेवर आधारित अभ्यासक्रम उपलब्ध करून देतो. मूल्यवर्धन कार्यक्रम, अल्पकालीन अभ्यासक्रम आणि प्रगत तंत्रज्ञानातील विविध प्रशिक्षण कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय बूट कॅम्प आणि कार्यशाळा, प्री-प्लेसमेंट चर्चा, विविध नामांकित संस्थांना औद्योगिक भेटी दिल्या जातात.
सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रमोद कोळसे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी सिव्हिल इंजिनीअरिंग सॉफ्टवेअर कोर्स, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, ॲप्टीट्युड ट्रेनिंग, मटेरियल कन्सल्टन्सी आणि इमारतींचे थर्ड पार्टी ऑडिट करणे, विद्यार्थ्यांना स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी याबाबत माहीती दिली जाते.
सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी वरिष्ठ प्रा. लक्ष्मण लहामगे यांनी सिव्हील इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांना असलेल्या संधीमध्ये सिव्हील इंजिनिअरिंग विद्यार्थांना तांत्रिक स्पर्धा परीक्षेत प्रचंड संधी उपलब्ध आहेत. ज्यामध्ये इमारती, पूल, रस्ते, धरणे आणि पाणीपुरवठा प्रणाली यासारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे डिझाइन, बांधकाम आणि देखभाल समाविष्ट आहे.
सिव्हिल इंजिनीअरिंगच्या विविध नोकऱ्यांच्या संधींबद्दल येथे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत जसे सिव्हिल इंजिनीअरिंग पदवीधर बांधकाम कंपन्या, सरकारी संस्था, सल्लागार संस्था, संशोधन संस्था आणि शैक्षणिक संस्थांसह विविध क्षेत्रांमध्ये काम करू शकतात. जगभरातील पायाभूत सुविधांच्या विकासाची सतत गरज असल्याने या विभागाला जागतिक स्तरावरही संधी आहे.
सिव्हील इंजिनिअरिंग विभागाने मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. आण्णासाहेब वराडे, सर्व विभागप्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थांनी अभिनंदन केले.
मी श्रीरामपूर येथील असून मला टोयो सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीमध्ये चांगल्या पॅकेजचे प्लेसमेंट मिळाल्याने मला आनंद होत आहे. सिव्हील इंजिनीरिंग विभागाद्वारे प्रदान केलेल्या शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या गुणवत्तेचा हा पुरावा आहे. विभागातील तज्ञ व अनुभवी प्राध्यापक यांनी माझ्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. अशा भावना हर्ष घोडेकर यानी व्यक्त केल्या आहेत.