◻️ तेजस पारखेने लांब ऊडी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याने राज्यस्तरीय खुल्या लांब उडी स्पर्धेसाठी त्याची निवड
संगमनेर LIVE (लोणी) | महाराष्ट्र राज्य असोसिएशन व अहमदनगर जिल्हा अँथेलेटीक्स असोसिएशन यांच्या वतीने नुकत्याच पाथर्डी येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेतून लोकनेते पद्यभुषन डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, प्रवरानगर येथील जैवतंत्रज्ञान या शाखेतील विद्यार्थी तेजस पारखे याने लांब ऊडी या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवत राज्यस्तरीय खुल्या लांब उडी स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
प्रवरेत गुणवत्तापुर्ण शिक्षणांसोबतचं मुलांना क्रिडा क्षेत्रातही करीअरची संधी उपलब्ध करुन दिली जाते. प्रवरेच्या सर्वच शाळा महाविद्यालयात सुसज्ज आणि सर्वसुविधासह क्रिडांगण जिमखाना, क्रिडा साहित्य यासह विविध क्रिडा प्रकारांतील तज्ञ क्रिडा शिक्षक असल्याने शैक्षणिक गुणवत्तेसह प्रवरा ही क्रिडा क्षेत्रातही अव्वल स्थानावर आहे.
तेजस पारखे यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य व सिनेट सदस्य डॉ. प्रदिप दिघे यांनी त्याचे कौतुक केले तर त्यास क्रीडा संचालक डॉ. उत्तम अनाप यांचे मार्गदर्शन लाभले.