◻️ महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाला पराभवाचा धक्का
◻️ दोन्ही जागा जिकूनही सरपंच पदाचा सस्पेस मात्र कायम..?
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील व शिर्डी मतदार संघातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाच्या अशा शिबलापूर ग्रामपंचायतीच्या दोन जागासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणूकीत माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाने दोन्ही जागावर मोठ्या मतधिक्याने विजय मिळवला आहे. त्यामुळे या पोटनिवडणूकीत ना. विखे पाटील यांच्या जनसेवा मंडळाला पराभवाचा सामना करावा लागल्याने हा विखे गटाला आश्वी जिल्हा परिषद गटात मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
राजकीय सत्ता नाट्याची गणिते जुळवत असताना ना. विखे पाटील गटाच्या सदस्याला जातपडताळणी नियमानुसार पदमुक्त करण्यात आले होते. तर आ. थोरात गटाचा एक सदंस्य मृत झाल्याने प्रभाग २ व प्रभाग ४ अशा दोन जागा रिक्त झाल्या होत्या. त्यामुळे नुकतीचं प्रशासनाकडून पोटनिवडणूकीची प्रक्रिया सुरु केल्यामुळे दोन जागासाठी ४ उमेदवार रिगंणात उतरले होते.
या पोटनिवडणूकीत प्रभाग क्रमांक २ मधून ना. विखे पाटील गटाकडून वैष्णवी महेंद्र जगताप विरुध आ. थोरात गटाच्या गितांजली संदीप मुन्तोडे तसेच प्रभाग क्रमांक ४ मधून सपना प्रदीप मुन्तोडे विरुध्द शेतकरी मंडळाच्या करुणा सागर मुन्तोडे यांच्यात थेट लढत झाली.
यामध्ये माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या शेतकरी विकास मंडळाच्या प्रभाग २ मधून गितांजली संदीप मुन्तोडे (३९६ मते) व प्रभाग ४ मधून करुणा सागर मुन्तोडे (३२९ मते) या मोठ्या फरकाने विजयी झाल्या. त्यामुळे ना. विखे पाटील यांच्या अधिपत्याखालील जनसेवा मंडळाला पराभवाचा सामना करावा लागल्याने आश्वी जिल्हापरिषद गटात हा मोठा धक्का मानला जात आहे.
राजकीय दृष्टया अतिषय महत्वाच्या अशा शिबलापूर ग्रामपंचायतीची पोटनिवडणूकीची मतदान प्रक्रिया नुकतीच गुरुवार दि. १८ मे २०२३ रोजी मोठ्या उत्सहात पार पडली होती. ही पोट निवडणूक सरपंच पदाचे भवितव्य ठरवणार असल्याने ना. विखे पाटील व आ. थोरात गटाच्या कार्यकर्त्यानी निवडूक प्रकिया अतिशय प्रतिष्ठेची करुन मतदान झाल्यानतंर विजतयाचे दावे केले होते.
या निवडणूक निकालानतंर ११ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत आता आ. थोरात गटाचे संदस्याचे संख्याबळ ५ तर ना. विखे गटाचे सहा सदंस्य आहेत. या पोटनिवडणूकीत दोन्ही जागा जरी शेतकरी विकास मंडळाने निवडून आणल्यातरी सरपंच पदाचा संस्पेस मात्र कायम असल्याची चर्चा मतदान निकालानतंर शिबलापूर सह पंचक्रोशीत सुरु असल्याने पुढील घडामोडीकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान दोन्ही विजयी उमेदवारासह जेष्ठ कार्यकर्त्याचा माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यानी यशोधन कार्यालयात संत्कार केला असून याप्रसंगी जयश्रीताई थोरात तसेच विजयाचे शिल्पकार सरपंच प्रमोद बोद्रें, जेष्ठ नेते दिलावर शेख, राजेद्रं चकोर, नंदू वालझाडे आदिसह तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.