◻️ आश्वी - तांबे गोठा - दाढ रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी सावधान
◻️ आश्वी - उंबरी रस्त्यावर बिबट्याच्या वावराने मोठी दहशत
जखमी बाळासाहेब तांबे
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी - दाढ रस्त्यावरुन शुक्रवारी सांयकाळी प्रवास करत असलेले पाटबंधारे विभागातील कर्मचारी बाळासाहेब कारभारी तांबे (वय - ५७) यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे ते जखमी झाले असून या परिसरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाल्याने पिजंरा लावण्याची मागणी केली जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाटबंधारे विभागात पाटकरी म्हणून काम करत असलेले बाळासाहेब कारभारी तांबे हे नेहमीप्रमाणे आश्वी - दाढ रस्त्यावरुन शुक्रवारी सांयकाळी ८.३० वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीवरुन प्रवास करत होते. यावेळी ते तांबे गोठा ते कँनोल रस्त्याने घरी चालले असताना तांबे वस्तीलगत शिकारीच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला करत तांबे यांच्या पायाला चावा घेतला. यांचवेळी नईम शेख हे दूध घालण्यासाठी चालले असल्याने बिबट्याने तेथून पलायन केले. त्यामुळे बाळासाहेब तांबे हे थोडक्यात बचावले आहे.
दरम्यान बाळासाहेब तांबे यांच्यावर तात्काळ लोणी येथिल प्राथमिक आरोग्य केद्रांत औषधोउपचार करत शनिवारी पुढील उपचारासाठी नगर येथील पाठवण्यात आले होते. औषधोपचार नतंर तांबे यांची तब्येत आता बरी असल्याची माहिती मिळाली असून याठिकाणी पिंजरा लावून हा बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अस्लम शेख सह परिसरातील नागरीकानी केली आहे.
आश्वी - उंबरी रस्त्यावर बिबट्याच्या वावराने दहशत..
आश्वी - उंबरी रस्त्यावर संध्याकाळच्या सुमारास मागील काही दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला असून या रस्त्यावरुन प्रवाशाना हा बिबट्या रोज दिसत असल्याने मोठी दहशत निर्माण झाली आहे. तर काही दिवसापूर्वीचं उंबरी बाळापूर येथिल एका व्यक्तीला या बिबट्या हल्ला करत जखमी केल्यामुळे हा बिबट्या पिजंरा लावुन जेरबंद करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.