Big Breking.. समृध्दी महामार्गावर बसच्या भीषण अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू

संगमनेर Live
0
◻️ बुलढाणा येथील सिंदखेडराजा परिसरातील घटना

◻️ मृतांमध्ये महिला पुरूष तसेच लहान मुलांचा समावेश

संगमनेर LIVE (बुलढाणा) | समृध्दी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसच्या डिझेल टाकीने पेट घेतला. मन हेलावून टाकणाऱ्या या दुर्देवी घटनेत आतापर्यंत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

बुलडाण्याजवळील सिंदखेडराजा परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून बसवरील आग नियंत्रणात आणली. ट्रॅव्हल्स मधील होरपळून मृत्यू झालेल्या प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

अपघातग्रस्त ट्रॅव्हल बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून ३३ प्रवाशी प्रवास करत होते. हा अपघात इतका भीषण होता, की २५ प्रवाशांचा अक्षरश: कोळसा झाला. मृतांमध्ये महिला पुरूष तसेच लहान मुलांचा समावेश आहे. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवणे सुरू आहे.

दरम्यान, बस चालकासह बसमधील ८ प्रवाशी सुखरूप बचावले आहेत. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत बसचालकाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ ट्रॅव्हल्सची खासगी बस ३० जून रोजी सायंकाळी ५ वाजता नागपूर वरून पुण्याच्या दिशेने जात होती.

१ जुलैच्या रात्री दीड वाजेच्या सुमारास बस बुलढाणा येथील सिंदखेडराजा परिसरात आली. बसचा वेग जास्त असल्याने समोरील टायर फुटले. त्यामुळे बस थेट दुभाजकाला धडकली. क्षणार्धात बसने पेट घेतला. बस दरवाजाच्या दिशेने उलटल्याने बसमधून प्रवाशांना बाहेर पडता आले नाही.

काही प्रवाशांनी खिडकीच्या काचा फोडून बाहेर उड्या घेतल्या. मात्र, गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही. त्यामुळे २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या अपघातात चालकासह ८ जणांचे प्राण वाचले. या भयानक घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत असून जखमींना उपचारासाठी बुलडाणा सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

****माहिती स्रोत :- एबीपी माझा, साम टीव्ही, न्यूज १८ लोकमत

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !