◻️ समृध्दी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकारने तातडीने पावली उचलावीत
संगमनेर LIVE | रात्री उशिरा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे बस उलटून पेट घेतल्यानंतर झालेल्या अपघातात २५ प्रवाशांचा अत्यंत दुःखद मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली असून सरकारने अपघात रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावी अशी आवाहनही केली आहे.
समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा जवळ बस एका खांबाला धडकून उलटली व यानंतर या बसने पेट घेतला. यामध्ये २५ प्रवाशांचा दुःखद मृत्यू झाला आहे ही संपूर्ण महाराष्ट्राची साठी अत्यंत दुःखदायक आहे.
या अपघातात जखमी झालेले प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावे अशी ईश्वराकडे प्रार्थना करताना त्यांनी समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला असून यावर सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने सरकारने उपाययोजना केल्या पाहिजे असे म्हटले आहे.
मागील काही दिवसांमध्ये अनेक अपघात या रस्त्यावर झाले असून वेग मर्यादा सह सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने त्वरित कार्यवाही करावी तसेच सर्व वाहन चालकांनीही वेग मर्यादा पाळावी असे आवाहन करताना या अपघातात मृत्यू पावलेल्या सर्व प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यानी अर्पण केली आहे.
आमदार सत्यजित तांबे यांच्याकडूनही श्रद्धांजली
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री खासगी बसचा झालेला भीषण अपघात मन सुन्न करणारा आहे. या अपघातात तब्बल २५ प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत. मागील काही दिवसांमध्ये अनेक अपघात या रस्त्यावर झाले असून अपघात रोखण्यासाठी सरकारने तातडीने पावली उचलावीत. या अपघातात मृत्यू पावलेल्या सर्व प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत. हीच ईश्वर चरणी प्रार्थना असे म्हटले आहे.