प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणी या विद्यालयाचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

संगमनेर Live
0
◻️ प्रवरेचे हजारो माजी विद्यार्थी देश - विदेशात कार्यरत

संगमनेर LIVE (लोणी) | मुलीच्या शिक्षणांत राज्यात आघाडीवर असलेल्या लोणीच्या प्रवरा कन्या विद्या मंदिरचा ५४ वा स्थापनादिवस विविध उपक्रमाने साजरा करतांनाच नवोदित कन्याचे स्वागतही करण्यात आले अशी माहीती प्राथमिक विभागाच्या प्राचार्या सौ. सिमा बढे यांनी दिली.

लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदीर लोणी या विद्यालयाचा वर्धापन दिन सर्व इयत्ता १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यीनी व शिक्षकांनी आनंदमय वातावरणात साजरा केला याप्रसंगी प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. सीमा बढे, पर्यवेक्षक बी. टी. वडितके, वरीष्ठ शिक्षक अनिल लोखंडे, आर. एम. लबडे, सुरेश गोडगे, जितेंद्र बोरा, सौ. मोहिनी गायके, सौ. स्वाती निर्मळ आदी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यीनीनी पुढाकार घेत केक कापला तसेच सर्व विद्यार्थ्यीनींना चॉकलेट वाटप करण्यात आले.

शिक्षक सुरेश गोडगे यानी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, १९६४ साली संस्थेचे अध्यक्ष व सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी पहिली इंग्रजी माध्यमाची प्रवरा पब्लिक स्कुलची स्थापना केली. त्यानंतर १९६९ ला कन्या मंदीर ची स्थापना करून ग्रामीण भागातील मुलीसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले. 

सुरुवातीला ही शाळा प्रवरानगर येथे सुरु करून नंतर १९९५ साली लोणी येथे २७ एकराच्या भव्य प्रांगणात निसर्गरम्य वातावरण व सुसज्ज इमारत उभारून सुरु झाली असे सांगितले. तर विद्यालयात अनुभवी शिक्षक वृंद, सुसज्ज प्रयोगशाळा, आय. सी. टी. लॅब., भव्य क्रिडांगणं स्विमिंग पूल, तायकांदो कराटे, संगीताचे धडे दिले जातात. 

दरवर्षी सातत्याने एस. एस. सी. परीक्षेचा निकाल १०० टक्के ची परंपरा कायम राखली असून एच. एस. सी. बोर्ड परीक्षेचा शाळेचा निकालही कायम राखलेला आहे. आज सुसज्ज हॉस्टेल सुविधा असल्यामुळे ६०० निवासी विद्यार्थ्यीनी शिक्षण घेत आहेत. तर आज विद्यालयामध्ये एकुण २९६३ विद्यार्थ्यींनी शिक्षण घेत आहे. अशी माहिती विद्यालयाचे पर्यवेक्षक बी. टी. वडितके यांनी दिली. शेवटी अनिल लोखंडे यांनी आभार मानले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !