संगमनेर LIVE (लोणी) | देशाची वाटचाल ही आत्मनिर्भर भारतांकडे सुरु आहे. केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या कृषि धोरणामुळे कृषि क्षेञात रोजगार निर्मीतीसह पायाभुत सुविधा देत असतांनाच सेंद्रिय शेतीला चालना मिळत आहे. उत्तम आरोग्यासाठी सेद्रिय शेती करुन शेतक-यांनी येणाऱ्या खरीप हंगामातून चांगले उत्पादन घ्यावे असे प्रतिपादन बाभळेश्वरच्या कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ शैलेश देशमुख यांनी केले.
राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे वाढदिवसाचे निमित्ताने कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वर येथे खरीप पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शैलेश देशमुख बोलत होते. यावेळी संगमनेर उपविभागीय कषि अधिकारी श्री विलास गायकवाड, केंद्रातील शास्ञज्ञ शांताराम सोनवणे, भरत दंवगे, डाॅ. विठ्ठल विखे आदीसह शेतकरी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना देशमुख यांनी खरीप पिकामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, मका, कापुस या पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान विषयी माहिती देतांना सुधारीत जातींचा वापर याविषयी माहीती देतांना सेंद्रिय शेतीवर मार्गदर्शन केले. शांताराम सोनवणे यांनी बिजप्रक्रिया, खत व्यवस्थापन, संतुलीत अन्नद्रव्ये व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन यांची माहीती दिली भरत दंवगे पीक संरक्षणा, एकात्मिक पिक संरक्षण विषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
उपविभागीय कृषि अधिकारी गायकवाड यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती देतांना पीक विमा, कृषि औजारे बॅन्क, सेद्रिय शेती गट स्थापना, शेतकरी उत्पादक कंपनीचे महत्व आदी विषयावर शेतकऱ्यांना माहिती दिली. याच कार्यक्रमाचे निमित्ताने शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेती बाबत प्रचार आणि प्रसार वाढण्याचे दृष्टीने राहाता तालुकयातील रांजणगाव खु. आणि एकरुखे गावातील निवडक शेतकऱ्यांना गांडुळखत उत्पादनसाठी गांडूळ बेडचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास राहाता तालुक्यातील शेतकरी, शेतकरी महिला आणि कृषि विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
राज्य शासनाने एक रुपयांमध्ये खरीप पिक विमा योजना, नमो शेतकरी सन्मान योजना, कृषि क्षेत्रासाठी स्टाॅर्ट अँप, तसेच विमा योजनेसाठी बदलण्यात आलेले निकष याबाबत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.