◻️ आश्वी पोलीसाची सादतपूर शिवारात मोठी कारवाई
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील सादतपूर शिवारात गोवंश जातीची ४२ वासरे घेऊन जाताना दोन पिकअप वाहनासह ४ आरोपीना आश्वी पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत आश्वी पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक संतोष भंडारे याना गुप्त बातमीदारामार्फत सादतपूर शिवारातील गोगलगाव - सातपूर रस्त्यावर दोन पिकेअप वाहणातून गोवंश जनावरे निर्दयीपणे घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण दैमिवाळ, व्ही. एम. गायकवाड व पोलीस नाईक एच. जी. शेख यांना याबाबत कारवाई करण्याच्या सुचेना दिल्या होत्या.
त्यामुळे आदेश मिळताच पोलीस पथक गोगलगाव - सातपूर रस्त्यावर दाखल झाले व त्यानी विकास म्हस्के, रविंद्र चौधरी, रोहित पानसरे यांना मदतीला घेऊन गोगलगाव - सातपूर रस्त्यावर असलेल्या दोन पिकअप वाहणावर छापा टाकला.
यावेळी एम. एच. १७ बीवाय ५३९९ या पिकअप वाहणात ८ ते १५ दिवसांची ४२ वासरे अत्यंत निर्दयीपणे भरलेली आढळून आली. तसेच एम. एच. १२. एमवी १५०६ या पिक अप वाहणात पांढऱ्या व विटकरी रंगाची जर्शी गाय मयत आढळून आली. त्यामुळे वाहणात असलेल्या व्यक्तीकडे याबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे १० लाख रुपये किंमतीची दोन पिकअप वाहणे, ५० हजार रुपये किंमतीची ४२ जर्शी वासरे व १२ हजार रुपये किंमतीची मयत जर्शी गाय यांना पोलिसांनी जप्त केले.
पोलिसांनी आरोपी हुसेन इब्राहिम तांबोळी (वय - ३८), अब्दूल ताहिर इस्माईल कुरेशी (वय -२७), रेहान महंमद आयात कुरेशी (वय - २२) व सालीत आयुब कुरेशी (वय - २०) सर्व राहणार ममदापूर, ता. राहाता यांच्या विरूद्ध आश्वी पोलीस ठाणे येथे गुरव नबंर १४२/२०२३ नुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम १९९५ चे कलम ५(अ)(१) सह ९, प्राण्याचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ३, ११ तसेच भादंवी कलम ४२९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल आर. बी. भाग्यवान हे पुढील तपास करत असून गोवंश वासरे मांची येथिल गो-शाळेत पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.