◻️ प्राथमिक उपचारानतंर पुढील उपचारासाठी तरुणाला नगरला हालवले
◻️ चिचंपूर, दाढ बुद्रुक, दाढ खुर्द व प्रतापपूर शिवारात बिबट्याची दहशत
संगमनेर LIVE | आश्वी - लोणी रस्त्यावर सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याने तरुणावर हल्ला केल्यामुळे आता पर्यत दोघाना जखमी केले असून मनुष्यावर एकाचं ठिकाणी हल्ला करण्याची ही चौथी घटना घडल्याने परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मोठा अनर्थ होण्यापूर्वी पिंजरा लावुन या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे संचालक कैलास तांबे यांनी केली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्याच्या पुर्वभागातील गावांनमध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याचा मनुष्यावर हल्ल्याचा घटनांनमध्ये मोठी वाढ झाली आहे. शुक्रवार दि. १६ जुन रोजी लोणी येथे मोटारसायकल दुरुस्तीचे काम करणारा मोहसीन रज्जाक पठाण (रा. टाकळीमियाँ) हा ग्राहकाची मोटर सायकल दुरुस्त करुन आश्वी खुर्द येथे देण्यासाठी आला होता. यावेळी मोटरसायकल देऊन तो आरीफ शेख व आदीनाथ भडकवाड यांच्यासोबत लोणीकडे जात असताना तांबे गोठा परिसरात शिकारीसाठी दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला करत मोहसीन पठाण यास जखमी केले होते.
तसेच दुसऱ्या दिवशी शनिवार दि. १७ रोजी चिंचपूर येथील विजय बाळा माळी याला हा दळण घेऊन जात असतांना दाढ बुद्रुक शिवारात बिबट्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले होते. यावेळी माळी यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून धुम ठोकली. याप्रसंगी माजी सरपंच किरण तांबे यांनी जखमी माळी यांना प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी व अहमदनगर येथे उपचार साठी हालविले होते.
यापुर्वी ७ जुन रोजी रात्री दाढ खुर्द शिवारातील हनुमानवाडी परिसरात राहत असलेल्या ज्ञानेश्वर निवृत्ती अंत्रे (वय - ३५) या तरुणावर बुधवारी पहाटे बिबट्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात हा तरुण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. तर प्रतापपूर शिवारात हि याआधी मोटरसायकल चालकावर हल्ला झाल्याचे झाला आहे.
त्यामुळे मनुष्यावर वेळोवेळी हल्ला करणाऱ्या बिबट्याच्या दहशतीमुळे चिचंपूर, दाढ बुद्रुक, दाढ खुर्द व प्रतापपूर शिवारातील शेतकरीवर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले असून कुठलाही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच या ठिकाणी पिजंरा लावुन हे बिबटे जेरबंद करावीत अशी मागणी विखे पाटील कारखान्याचे संचालक कैलास तांबे यांच्यासह भारत तांबे, किरण तांबे, समीर तांबे, शंकर तांबे, दाढ बुद्रुकचे योगेश तांबे, दाढ खुर्दचे सरपंच सतिश जोशी, संतोष जोशी, प्रतापपूरचे सरपंच दत्तात्रय आंधळे तसेच आ. राधाकृष्ण विखे ट्रक वाहतुक सोसायटीचे संचालक शिवाजीराव इलग यांच्यासह स्थानिक नागरीकानी केली आहे.
वनविभागाचा जाणीवपूर्वक कानाडोळा..
मागील काही दिवसात तांबे गोठा परिसरात बिबट्याने नागरीकानवर चार ते पाच हल्ले केले आहेत. मात्र दाढ बुद्रुक हे गाव कोपरगाव वनविभागाअतर्गत येत असल्याने वनविभागाकडून स्थानिक नागरीकानी केलेल्या पिजंरा लावण्याच्या मागणीला उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने नागरीक हैरान झाले असल्याची भावना नागरीकानी व्यक्त केली आहे.