अश्विनी पतसंस्थेचे संचालक राजेंद्र गिते यांच्यावर भर दिवसा बिबट्याचा हल्ला

संगमनेर Live
0
◻️ दैव बलवतर म्हणून थोडक्यात बचावले

संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील पिप्रीं - लोकी अजमपूर शिवारात रविवारी सकाळी ९ विजेच्या सुमारास अश्विनी पंतसंस्थेचे संचालक राजेंद्र लहानु गिते (वय - ४५) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला असून दैव बलवतर म्हणून गिते थोडक्यात बचावले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अश्विनी पंतसंस्थेचे संचालक व शेतकरी राजेंद्र गिते हे रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घराकडून आपल्या शेताकडे दुचाकीवरून चालले होते. यावेळी पिप्रीं - लौकी अजमपूर शिवारातील तसेच दाढ खुर्द शिवेलगत असलेल्या गिते मळा येथिल लोखंडी पुलाजवळून आले होते. 

यावेळी शिकारीच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने गिते यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यामुळे राजेंद्र गिते हे दुचाकीवरून खाली कोसळले परंतू, त्यांनी प्रसंगावधान राखत मोठ्याने आरडा - ओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गिते मळा येथिल नागरीकानी तिकडे धाव घेतल्याचे पाहून बिबट्याने झुडपात पलायन केले. याप्रसंगी बिबट्याने पंजा मारल्याने गिते यांच्या उजव्या पायाच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली आहे.

टिप**** सदर बातमी संगमनेर LIVE च्या पुर्व परंवागीशिवाय इतर कोणत्याही न्यूज पोर्टल अथवा दैनिक यानी कॉपी राईट करु नये, अन्यथा बातमी ज्या ग्रुप अथवा इतर ठिकाणी शेअर केली जाईल तेथे त्या न्यूज पोर्टल व दैनिकाची लाईकी दाखवली जाईल. कळावे, संगमनेर LIVE

यावेळी स्थानिक नागरिकाच्या मदतीने राजेंद्र गिते यांना प्राथमिक उपचारासाठी दाढ बुद्रुक येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रांत दाखल केल्यानंतर खबरदारी म्हणून पुढील उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

दरम्यान यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले गोकुळ गिते, भीमराज गिते, संभाजी गिते, सीताराम गिते, ज्ञानदेव गिते, बाळासाहेब गिते, गणेश गिते, तुकाराम गिते, जयराम गिते, गोरख गिते, कैलास गिते, नानासाहेब गिते, एकनाथ गिते आदींनी आक्रमक भूमिका घेत मागील अनेक दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे याठिकाणी पिजंरा लावून हा बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी केली आहे.

गिते मळा परिसरात गिते यांच्यावर बिबट्याचां हल्ला झाल्याची माहिती गोकूळ गिते यांनी वनविभागासह परिसरातील महत्वाच्या व्यक्तींना कळवली होती. त्यामुळे दाढ खुर्दचे सरपंच सतिष जोशी यांच्यासह अहिल्यादेवी पंतसंस्थेचे चेअरमन ज्ञानेश्वर वाडगे यानी घटनास्थळी जाऊन जखमी राजेंद्र गिते यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला आहे. तसेच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी येऊन पाहणी करुन गेले आहेत.

टिप**** सदर बातमी संगमनेर LIVE च्या पुर्व परंवागीशिवाय इतर कोणत्याही न्यूज पोर्टल अथवा दैनिक यानी कॉपी राईट करु नये, अन्यथा बातमी ज्या ग्रुप अथवा इतर ठिकाणी शेअर केली जाईल तेथे त्या न्यूज पोर्टल व दैनिकाची लाईकी दाखवली जाईल. कळावे, संगमनेर LIVE

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !