◻️ विशेष श्रेणी ३, प्रथम श्रेणी ८, द्वितीय श्रेणी १२ व पास श्रेणी मध्ये ४ विद्यार्थ्याचे सुयश
संगमनेर LIVE | लोकनेते प्रद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा माध्यमिक विद्यालय शिबलापूर विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहीती प्राचार्य एस.पी. कडलग यांनी दिली.
या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण २७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी २७ विद्यार्थी पास झाले आहेत. यामध्ये विशेष श्रेणी मध्ये - ३, प्रथम श्रेणी मध्ये - ८, द्वितीय श्रेणी मध्ये - १२, पास श्रेणी मध्ये - ४ विद्यार्थी पास झाले असून विद्यालयामध्ये कु. तमन्ना लालमहमंद शेख ८४ टक्के गुण मिळवत प्रथम, कु. साक्षी जालिंदर चव्हाण ८२.६० टक्के गुण मिळवून व्दितीय, कु. तृप्ती विजय मुन्तोडे ७८.२० टक्के गुण मिळवत तृतीय तर कु. उषा नामदेव बोंद्रे हिने ७२.२० टक्के गुण मिळवत चौथा क्रमांक पटकावला आहे.
विद्यार्थ्यानच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे, खा. डॉ. सुजय विखे पाटील, जेष्ठ नेते जेहुरभाई शेख, विजय मुन्तोडे, सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिकचे संचालक डाॅ. प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, शिक्षण अधिकारी प्रा. नंदकुमार दळे, प्राचार्य एस. पी. कडलग आणि सह शिक्षक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.