◻️ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध
◻️ संचालक मंडळाने सहकारी बॅकींग क्षेत्रात बॅकेचा नावलौकीक कायम ठेवावा - ना. विखे पाटील
संगमनेर LIVE (लोणी) | सहकारी बॅकींग क्षेत्रात नावलौकीक मिळवून असलेल्या प्रवरा सहकरी बॅकेच्या चेअरमन पदावर डॉ. भास्करराव निवृत्ती खर्डे आणि व्हा. चेअरमन पदी मच्छिंद्र रखमाजी थेटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली.
बॅकेच्या चेअरमन आणि व्हा. चेअरमन पदाची निवड करण्यासाठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक विशेष सभा बोलविण्यात आली होती. सहकरी संस्थाचे उपनिंबधक रावसाहेब खेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत चेअरमन पदासाठी भास्करराव निवृत्ती खर्डे यांच्या नावाची सूचना संचालक शंकर रंगनाथ बेंद्रे यांनी मांडली, त्यास संचालक केशव पंढरीनाथ जवरे यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमन पदासाठी मच्छिंद्र रखमाजी थेटे यांच्या नावाची सूचना संचालक माधव बाळाजी गायकवाड यांनी मांडली त्यास संचालक बाजीराव गेणुजी खेमनर यांनी अनुमोदन दिले. या दोन्ही पदांच्या निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले.
मंत्री ना. राधाकृष्ण विखे यांनी नूतन पदाधिकारी आणि संचालक मंडळाचे अभिनंदन केले असून, प्रवरा बॅकेने बॅकींग क्षेत्रात व्यवसायाची परंपरा चांगली ठेवली. संचालक मंडळाने आजपर्यंत ग्राहक हित जोपासून सहकारी बॅकींग क्षेत्रात बॅकेचा नावलौकीक कायम ठेवला. भविष्यातही असेच काम घडेल आशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी नविन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील, डॉ. विखे पाटील कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वासराव कडू, ट्रक वाहतूक सोसायटीचे चेअरमन नंदूशेठ राठी यांच्यासह सर्वानीच नूतन पदाधिकारी व संचालकाचे अभिनंदन केले आहे.