संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यात मार्च २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि गारपीटीत नूकसान झालेल्या १ हजार ३६६ शेतकऱ्यांना महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे १ कोटी ६० लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे.
संगमनेर तालुक्यात नूकसान झालेल्या शेती पिकांची पाहाणी केली होती. झालेल्या नूकसानीचे पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी महसूल अधिकाऱ्याना दिल्या होत्या. तसेच झालेल्या नूकसानी पोटी मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली होती.
तालुक्यात शेती पीकांच्या झालेल्या नूकसानीचे गांभीर्य लक्षात घेवून मंत्री विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यानूसार १ हजार ३६६ शेतकऱ्याना १ कोटी ६० लाख रूपयांची मदत शासनाने मंजूर केली आहे.
या शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या सहकार्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष सतिष कानवडे, शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, अमोल खताळ, भाजयुमोचे शैलेश फटांगरे, सरपंच संदिप देशमुख, कोल्हेवाडीच्या सरपंच सौ. सुवर्णा दिघे, जोर्वेच्या सरपंच सौ. प्रिती दिघे, निळवंडेच्या सरपंच सौ. शशिकला पवार यांसह तालुक्यातील शेतकरी तसेच संगमनेर तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यानी तसेच लाभार्थी शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.