सकल हिंदू समाजाच्या मोर्चात सहभागी न होता मोर्चावर टीका करणाऱ्यांचे मनसुभे उघड!

संगमनेर Live
0
◻️ हिंदू समाजाच्या भावना दुखाविनाऱ्यांना येणारा काळच उत्तर देईल

◻️ आ. थोरात यानी मोर्चावर दंगल घडविण्याचा केलेला आरोप दुर्दैवी

संगमनेर LIVE | जोर्वे गावातील युवकांवर एका समाजाकडून हल्ले झाल्यानंतर शब्दाचीही प्रतिक्रिया व्यक्त न करण्याऱ्या आ. बाळासाहेब थोरात यांनी सकल हिंदू समाजाच्या मोर्चावर दंगल घडविण्याचा केलेला आरोप हा अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, सतीश कानवडे, अमोल खताळ, गोकुळ दिघे, राहुल दिघे, राहुल भोईर, बापूसाहेब देशमुख यांच्यावतीने व्यक्त करण्यात आली.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि, जोर्वे आणि पंचक्रोशीतील गावांमधून संगमनेर शहरात येणाऱ्या शेतकरी, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांना होत असलेल्या त्रास तसेच संगमनेर मध्ये सुरु असलेले लव जिहाद प्रकरणे, पोलिसांवरील हल्ले, नुकतेच जोर्वे गावातील शेतकरी यांच्यावर झालेला हल्ला या त्रासाची स्वभाविक प्रतिक्रिया हा मोर्चा काढण्याच्या मागे होती. परंतु या भावनाचा आदर न करता मोर्चाला भेटलेल्या उदंड प्रतिसादामुळे व्यथित झालेले आ. थोरात यांनी सकल हिंदू समाजाच्या मोर्चामधील सहभागी ५० हजार पुढील हिंदू बांधवांचा एक प्रकारे अपमान केला आहे. मोर्चा दंगल घडविण्यासाठी होता हा आ.थोरातांचा आरोप अतिशय बिनबुडाचा व केविलवाणा आहे.

तालुक्यात लव्ह जिहादच्या व धर्मातराच्या घटनांची संख्या वाढत चालल्या आहेत. मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून, केवळ एका समाजाला पाठीशी घालण्याचे काम आ.थोरातांकडून केवळ स्वत:च्या राजकारणासाठी केले जात आहे. तुमच्याच जोर्वे गावातील युवकांना मारहाण झाल्यानंतर त्यांची विचारपूस करणे तुमचे कर्तव्य होते, पण त्यावर कोणतेही भाष्य न करता थेट मोर्चावर दंगलीचा आरोप करून आपण हिंदू समाजाच्या भावना जाणीवपूर्वक दुखवित आहात. ग्रामीण भागातील मुली, महिलांवर होणारी अश्शील शेरेबाजी, छेडछड, युवकांना होणारी मारहाण यावर मात्र आपण ४० वर्षापासून गप्प आहात.

मोर्चा झाल्यावर वाद घडवून आणून पुन्हा सकल हिंदू समाज एकत्र येऊ नये यासाठी झालेले हे एक षडयंत्र तर नाही ना? अटक असलेल्या आरोपी मध्ये कोणत्या पक्षाचे लोक आहे हे न पाहता सकल हिंदू समाज त्यांना एक हिंदू म्हणून मदत करत आहे पण आपण आपली राजकीय सोई पाहत आहात यांचे हिंदू समाजाला दुःख आहे. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आपण एखाद्या वाचाळवीर सारखे दंगल दंगल करत आहात. 

मोर्चा पार्श्वभूमीवर आपण काढलेले पत्र सुद्धा एका विशीष्ट समाजाची पाठराखण करणारे होते, तुमच्या पत्रामुळेच हिंदू समाजाची भावना अधिक तीव्र बनली. याबाबत आपण मोर्चाला जाऊ नका यासाठी बैठका घेऊन सुद्धा लोकांनी तुम्हाला नाकारून मोर्चा मध्ये उस्फुर्त सहभाग घेतला यांचे दुःख आपणास झाले ते आपण बोलून दाखविले. 

तुमच्या पत्राचा निषेध म्हणूनच लाखो हिंदू समाज या मोर्चात स्वयंमस्पुर्तीने सहभागी झाला आणि एक प्रकारे आपण काढलेल्या पत्राच्या विरोधातील संतप्त भावना या मोर्चातून व्यक्त झाली यांचे दुख: तुम्हाला बोचत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपण केलेल्या निराधार आरोप मागे घेऊन हिंदू समाजाची माफी मागणी अन्यथा हिंदू समाज आपणास माफ करणार नाही. असे या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !