संगमनेर LIVE | श्री क्षेत्र उंबरेश्वर देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती महंत दत्तगिरी महाराज यांचा जन्मदिवस संगमनेर तालुक्यातील पिंप्री फाटा येथिल महालक्ष्मी दूध संस्थेचे संस्थापक चेअरमन रमेश गिते व त्याच्या सहकाऱ्यानी मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.
पिप्रीं लौकी आजमपूर येथिल महालक्ष्मी दुध संस्था ही पंचक्रोशीतील दूध उत्पादक शेतकऱ्याची कामधेनू म्हणून ओळखली जाते. संस्थेचे चेअरमन रमेश गिते यांनी नुकतांच महंत दत्तगिरी महाराज यांचा जन्मदिवस त्यांच्या निवास्थानी आयोजित केला होता.
याप्रसंगी जनसेवा मंडळाचे भारतराव गिते, अश्विनी पतसंस्थेचे संचालक भाऊसाहेब लावरे, गिते क्लासेसचे संचालक प्रा. अशोक रमेश गिते, अगस्ती दुध संस्थेचे चेअरमन बाजीराव देवराम गिते, सुर्यभान गिते, मंगेश बबनराव गिते, बबनराव दराडी, संपतराव दराडी, संदिप गिते, डॉ. रंगनाथ गिते सह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान यावेळी गिते कुटुंबाकडून दत्तगिरी महाराजाचे औक्षण करण्यात आले. यानतंर महाराजानी उपस्थिताना मार्गदर्शन करताना अध्यात्माकडे चला असे आवाहन केले.