गतिमान सरकार पोहचल गावा गावात !

संगमनेर Live
0
◻️ मंत्री विखे पाटील यांच्याकडून समस्यांचा निपटारा

संगमनेर LIVE (राहाता) | एकीकडे शासन आपल्या दारी उपक्रमातून सरकारची यंत्रणा गावोगावी पोहचली असतानाच, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अधिकाऱ्यांना घेवून थेट वाड्या वस्त्यांवर जावून लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक आणि योजनेच्या अंमलबजावणीच्या आढावा घेवून गतिमान सरकारचे काम जनतेपर्यत पोहचवत आहे.

मागील दोन दिवसांपासून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघात गावोगावी जावून शासनाच्या योजनांच्या  अंमलबजावणीचा आढावा घेत असून, सर्वच विभागाचे अधिकारी त्यांच्या समवेत दौर्यात सहभागी झाल्याने नागरीकांच्या येणाऱ्या निवेदनांचा निपटारा देखील जागीच होत असल्याने नागरीकांना दिलासा मिळत आहे. अनेक गुंतागुंतीच्या कामात अधिकारी ग्रामस्थ यांनी एकत्रितपणे बसून मार्ग काढण्याचे सूचित करून बहुतांशी तक्रारी रस्त्यांच्या असल्याने  कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबबातही मंत्री विखे पाटील ग्वाही देत आहेत. बहुतांशी गावात शेतरस्ते शिवार रस्ते यांचे प्रश्न समोर आले आहे. महसूल विभागाची भूमिकाच आता रस्ते मोकळे करून टाकण्याची असल्याने या दौऱ्यात रस्त्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लागत असल्याचे दिसते.

घरकुल योजनेबाबतही गांभीर्याने उपाय योजना करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील देत आहेत जलजीवन मिशन योजनेची काम मिशन मोडवर करण्याच्या सूचना देतानाच ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असल्याने यामध्ये पारदर्शी काम करून प्रत्येक घरात पाणी पोहचवण्याचे आवाहन अधिकारी पदाधिकारी कार्यकर्त्यांना या दौऱ्याच्या निमित्ताने केले आहे.

या दोऱ्यामुळे शासनचा प्रत्येक विभाग अलर्ट झाला असून एकीकडे शासन निर्णय करते परंतू काहीवेळेस प्रशासकीय हलगर्जीपणामुळे त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे योजनांचा लाभ मिळण्यातही अडसर निर्माण होतो. परंतू शासन आपल्या दारी उपक्रम सुरू असतानाच मंत्री विखे पाटील यांनी गावोगावी थेट लोकांमध्ये जावून गतिमान सरकारची कार्यपद्धतीची जाणीव लोकांना करून दिली आहे.यापुर्वी विखे पाटील यांच्या जनता दरबारची चर्चा राज्यात झाली. आता लोकांमध्ये जावून योजनांची माहीती देण्याचा पॅटर्नची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !