◻️ सात्रळ, लोणी, आश्वी, राहाता, कोल्हार महाविद्यालयात वृक्षा रोपन व रक्तदान शिबीर
◻️ राज्यातील अनेक मान्यवरांकडून मंत्री विखे पाटील यांना दुरध्वनी वरुन तसेच समाज माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा
संगमनेर LIVE (लोणी) | राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्ताने आज सामाजिक उपक्रमांचे आयोजन प्रवरा परिवाराच्या वतीने करण्यात आले होते. राज्यातील अनेक मान्यवरांनी मंत्री विखे पाटील यांना दुरध्वनी वरुन तसेच समाज माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
लोणी बुद्रूक येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांच्या उपस्थित दिव्यांग नागरीक तसेच विद्यार्थ्यांना विविध साहीत्य व आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात जेष्ठ संचालक ज्ञानदेव म्हस्के यांनी वृक्षारोपण केले. यावेळी सर्व संचालकांसह आधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना व प्रवरा शैक्षणिक संकुलातील शाळा, महाविद्यालयामध्ये वृक्षारोपणासह ग्रामस्थांनी शैक्षणिक साहीत्याचे वाटप केले. प्रवरा औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, प्रवरा तंत्रनिकेतन, पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय, प्रवरा अभियांत्रिकी, महीला संगणक महाविद्यालय आणि उच्च महाविद्यालय सात्रळ, लोणी, आश्वी, राहाता, कोल्हार येथे राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, कॉलेज कट्टा या अंतर्गत वृक्षा रोपनासह, रक्त रक्तदान शिबीर घेण्यात आले.
भारतीय जनता पार्टी, भारतीय युवा मोर्चा, पक्षाच्या विविध सेलच्या वतीने गावोगावी सामाजिक उपक्रमातून ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
लोणी येथील प्रवरा गर्ल इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये ना. विखे पाटील यांचा वाढदिवस सर्व विद्यार्थीनींनी मोठ्या उत्साहात साजराक केला. वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व विद्यार्थींनींनी योगा करण्याचा संकल्प केला. तसेच शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपनही करण्यात आले. यावेळी विद्यार्थींनींनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी इयत्ता पहिलीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थींनींना शाळेच्या पहिल्या दिवशी चॉकलेट व गुलाबाचे फुल देवून प्राचार्य सौ. देशमुख यांच्यासह सर्व शिक्षकांनी स्वागत केले.
पायरेन्स संस्थेच्या वतीने चंद्रापुर येथे डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल येथे सर्वरोग निदान शिबीर आणि रक्त तपासणी करण्यात आली. निमगाव जाळी येथील बालाजी सांस्कृतिक कला आणि क्रिडा प्रतिष्ठानच्या वतीने दंत चिकीत्सा शिबीर, वृक्षारोपण, शैक्षणिक साहीत्य वाटप आणि तारे जमीन पर या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आला.
कृषि संलग्नित महाविद्यालयाच्या वतीने पिंप्री लौकी-अंजमपूर येथे महीलासाठी फळ प्रक्रिया, अन्न प्रक्रिया आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मीती या विषयांवर एकदिवसीय कार्यशाळा घेऊन महीलांना स्वयंरोजगार याविषयी कृषि संचालिका डॉ. शुभांगी सांळोखे यांनी मार्गदर्शन केले. कृषि विज्ञान केंद्र बाभळेश्वर येथे खरीप पिक परिसंवादातून कपाशी, तुर, बाजरी, मका उत्पादन तंत्रज्ञान आणि सेंद्रीय शेती आदी विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.