◻️ संगमनेर संघाचे संघपती शिरीष दर्डा व चातुर्मास समितीचे अध्यक्ष राजकुमार पारख यांची माहिती
संगमनेर LIVE | जैन परंपरेच्या चातुर्मास रविवार दि. २ जुलै पासुन सुरु होत असून संगमनेर येथील जैन स्थानकमध्ये प्रखर व्याख्याता पू. श्री. विश्वदर्शनाजी म. सा. व विद्याभिलाषी पू. श्री. तिलकदर्शनाजी म. सा. या साध्वींचा चातुर्मास होणार आहे अशी माहिती संगमनेर संघाचे संघपती शिरीष दर्डा व चातुर्मास समितीचे अध्यक्ष राजकुमार पारख यांनी दिली.
चातुर्मासनिमित्त साध्वींजींचा मंगल प्रवेश गुरुवार दि. २९ जुन रोजी आनंद नागरी सहकारी पतसंस्था पासुन शोभा यात्रेने जैन स्थानक, सुयोग सोसायटी, संगमनेर येथे सकाळी ८.३० ला आगमन होणार आहे. मंगल प्रवेश निमित्त सकल जैन समजाला गौतम प्रसादीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या मंगल प्रवेश व शोभा यात्रेमध्ये सकल जैन समाज व नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जैन संघ संगमनेरच्या वतीने संघाचे विश्वस्त वसंत फिरोदिया व प्रफुल्ल बोगवत यांनी केले आहे.
दरम्यान चातुर्मास यशस्वी करण्यासाठी जैन युथ फेडरेशन, जैन सोशल लेडी ग्रुप व कन्या मंडळ आदि प्रयत्नशिल असून चातुर्मास काळात सर्वानी प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.