◻️ माजी जिल्हापरिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील विद्यार्थ्यासमवेत झाल्या दिंडीत सहभागी
संगमनेर LIVE (लोणी) | ‘ज्ञानोबा माऊली तुकराम’ नामाचा जयघोष करत लोणीच्या प्रवरा कन्या विद्या मंदीर येथील मुलीच्या दिंडीने अवखा परिसर दुमदुमुन सोडला होता. भजन, रिंगसोहळा पालखी मिरवणूक आणि टाळ-मृदूगाच्या जयघोषत मुलींनी दिंडीचा आनंद घेत असल्याचे पाहुन उपस्थिताच्या डोळ्याचे पारणे फिटले.
गुणवत्ता पूर्ण शिक्षणासोबतचं आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी दरवर्षी प्रवरेच्या शाळामध्ये विविध उपक्रम सुरु असतात. यामध्ये पंढपूरच्या आषाढी वारीचे मुलींना मोठे आकर्षण असते असे प्रवरा कन्या विद्या मंदीरच्या मुख्यध्यापिका सौ. सिमा बढे यांनी सांगितले. या दिंडी सोहळ्यामधे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे आदीसह शिक्षक विद्यार्थी सहभागी झाले होते.
दरम्यान या पालखी सोहळ्यात मिरवणूक, विविध संताच्या वेशभुषा, तुलसी वृदावंन, कपाळी केशरी गंध, भगव्या पतका, मुखात हरीनामाचा जयघोष करत विद्यार्थी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होते.
विद्यार्थ्याचा उत्साह आणि भक्तीमय वातावरणात सौ. विखे पाटील यांनी ही पाऊली खेळत ज्ञानोबा माऊली तुकारामाचा जयघोष करत विद्यार्थ्याना पायी दिंडी सर्वधर्म समभावाचा संदेश दिला. यावेळी सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी चिमुकल्याचे कौतुक केले.