◻️आश्वी बुद्रुक येथे आयोजित मोफत सर्वरोग निदान शिबीरा प्रसंगी सौ. धनश्रीताई विखे पाटील महीलाशी साधला संवाद
◻️ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून शिर्डी मतदारसंघातील गावांमध्ये शिबिराचे आयोजन
संगमनेर LIVE | महीलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत स्वता:साठी देखिल वेळ देण्याची गरज आहे. आरोग्यविषयी असो किंवा इतर समस्यासाठी प्रवरा परीवार नेहमीचं आपल्या सोबत आहे. असे प्रतिपादन रणरागिणी महीला मंडळ अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी केले.
पायरेन्सच्या डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, लोणी जनसेवा फौडेशन, यांच्या संयुक्त विद्यमाने आश्वी बुद्रुक येथे मोफत सर्वरोग निदान, रक्त तपासणी आणि गर्भाशयमुख कर्करोग निदान शिबीरा प्रसंगी सौ. धनश्रीताई विखे पाटील महीलाशी संवाद साधतांना बोलत होत्या.
यावेळी संस्थेचे सचिव डाॅ. निलेश बनकर, आयबीएमए चे संचालक डॉ. मोहसीन तांबोळी, डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांचे डॉ. आश्विनी बोरा, डॉ. अमित विलायते, डॉ. कविता आहेर, डॉ. शोभा तांबे, डॉ. अविनाश वाणी, डॉ. स्वप्नाली बारी, डॉ. भाग्यश्री जमादार, प्रवरा बॅकचे संचालक अजय ब्राम्हणे, अशोकराव जऱ्हाड, दिपक सोनवणे, बाळासाहेब सांगळे, प्रशासकीय अधिकारी सचिन जाधव, संकेत संत, आशिया तांबोळी आदीसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सौ. धनश्रीताई विखे पाटील म्हणाल्या, आरोग्याच्या चांगल्या सुविधा आपल्या भागात असल्याने आणि वेळोवेळी आयोजित होणाया शिबीरातूनही रुग्णांना मोठा आधार मिळत असतो. सर्वानीच आहार व्यायाम आणि आरोग्याची काळजी घेतांनाच कोणताही आजार अंगावर काढू नका असे सांगितले यावेळी आश्वी परिसरांतील अनेक गरजू रुग्णांनी शिबीराचा फायदा घेतला. यावेळी आश्वी परिसरांतील विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, लोणी आणि जनसेवा फौडेशन अंतर्गत शिर्डी मतदार संघातील विविध गावामधून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून गर्भाशय मुख कर्करोग निदान शिबीराद्वारे हजारो महीलांची मोफत तपासणी होत असल्याने महीलांना मोठा आधार आणि कर्करोगांविषयी जनजागृती होत आहे.