◻️ मंत्रिमंडळ विस्तार करणे सरकारसाठी सोपे नाही
◻️ सरकार विकासाच्या मुद्द्यावर मते मागू शकत नसल्याने सर्वत्र जाहिरात बाजी सुरु
संगमनेर LIVE | सध्या राज्यात आलेले सरकार हे लोकशाही पद्धतीला मान्य नाही. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा या सरकारच्या येण्याच्या पद्धतीवर ताशेरे ओढले आहे. बेकायदेशीर आलेले व सरकार टिकले असले तरी जनतेच्या मनात सरकार बद्दल प्रचंड असंतोष असून सरकार बद्दल प्रतिकूल मत असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे
संगमनेर येथे माध्यमांच्या प्रतिनिधी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, खरे तर राज्यात आलेले सरकार हे लोकशाहीला मान्य नाही. या सरकारच्या येण्याच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ताशेरे ओढली आहे. बेकायदेशीरपणे आलेले हे सरकार टिकले एवढेच काय आहे.
सरकार विकासाच्या मुद्द्यावर मते मागू शकत नाही म्हणून सध्या सर्वत्र जाहिरात बाजी केली जात आहे. जाहिरात केली म्हणून जनतेचे मन बदलेल असे होणार नाही. वाढलेली महागाई, बेरोजगारी यामुळे जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे. सरकार मात्र फक्त जाहिरात बाजी व्यस्त आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जातात यावरून या सरकारमध्ये निवडणुकीला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास नाही.
कितीही जाहिरात बाजी केली असली तरी येणाऱ्या लोकसभा व विधानसभा मधून जनता आपले सरकार विरोधी मत व्यक्त करेल असे सांगताना सध्याच्या सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करणे सोपे नाही. कारण ४० लोकांना मंत्री करण्याचे आश्वासन दिले असल्याने मंत्रिमंडळ विस्तार होणे अवघड आहे. या सर्व आमदारांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचेही आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.