◻️ सात्रळच्या सार्थक कडू व लोणीच्या अन्वेष शेट्टी यानी राष्ट्रीय स्तरावर पटकावले सिल्वर मेडल
◻️ डी. के. स्पोर्ट्स क्लबच्या ३८ खेळाडूची विविध खेळामध्ये सर्वोत्तम कामगिरी
संगमनेर LIVE | फर्स्ट एज्युकेशन अँड स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या नाशिक येथील विभागीय क्रीडा संकुल येथे २ ते ४ जून दरम्यान संपन्न झालेल्या क्रिकेट स्पर्धेत राहाता तालुक्यातील लोणी येथिल डी. के. स्पोर्ट्स क्लबच्या दोन क्रिकेट खेळाडूनी नेत्र दीपक यश मिळवले असून या खेळाडूचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सार्थक गोविंद कडू (रा. सात्रळ, ता. राहुरी) व अन्वेष उदय शेट्टी (रा. लोणी खुर्द, ता. राहाता) या खेळाडूंनी पुणे अंडर फोर्टीन क्रिकेट संघाकडून नाशिक येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेत सहभाग नोदंवून द्वितीय स्थान प्राप्त करत राष्ट्रीय स्तरावर सिल्वर मेडल प्राप्त केले आहे.
या विद्यार्थ्याना क्लबचे प्रशिक्षक प्राध्यापक दीपक रणपिसे व प्रशिक्षक सुशांत शेळके यांचे मार्गदर्शन लाभले असून आत्तापर्यंत डी. के. स्पोर्ट्स क्लबच्या ३८ खेळाडूंनी क्रिकेट, फुटबॉल, योगा, एअर पिस्तोल, एअर रायफल शूटिंग, स्केटिंग, कॅरम आणि चेस अशा विविध खेळांमधून राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली असल्याची माहिती क्लबकडून देण्यात आली आहे.