◻️ प्राथमिक उपचारानतंर पुढील उपचारासाठी नगरला हालवले
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द शिवारातील हनुमानवाडी परिसरात राहत असलेल्या ज्ञानेश्वर निवृत्ती अंत्रे (वय - ३५) या तरुणावर बुधवारी पहाटे बिबट्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात हा तरुण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत स्थानिक नागरीकाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर अंत्रे हा तरुण पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास शेतात उभारलेल्या गोठ्यात स्वच्छता करत होता. यावेळी शेणाची टोकर टाकण्यासाठी गोठ्यापासून थोड्या अतंरावर चालला असताना शिकारीच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.
याप्रसंगी ज्ञानेश्वर याने प्रसंगसावधान दाखवत मोठ्याने आरडाओरडा केल्यामुळे बिबट्याने तेथून पलायन केले. मात्र यापूर्वी बिबट्या व ज्ञानेश्वर यांच्यात दोन ते तीन मिनिटे जोरदार झुंज झाल्यामुळे ज्ञानेश्वर यांच्या हातावर व डोक्याला जखमा झाल्यामुळे रक्तस्राव होत होता. त्यामुळे कुटुंबासह स्थानिकाच्या मदतीने त्याला प्राथमिक उपचारासाठी लोणी व पुढील उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताचं दाढचे कर्तव्यदक्ष सरपंच सतिष जोशी हे घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी त्यानी जखमी तरुणासह कुटुंबाचे धाडस वाढवत योग्य ती मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. तर या ठिकाणी पिजंरा लावुन हा बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी सरपंच सतिष जोशी यांच्यासह नितिन पाबळे, दिपक अंत्रे, ग्रामपंचायत सदंस्य शरद बनगैया, स्वंप्नील अंत्रे, गोविंद पाबळे, संतोष दातीर, पप्पु अंत्रे, शरद गिते, रोहिदास गिते, गिताराम अंत्रे, ज्ञानेश्वर साळवे आदिसह स्थानिक नागरीकानी केली आहे. तर या तरुणाची तब्बेत बरी असल्याची माहिती मिळाली आहे.