◻️ ऋत्वी आयुर्वेदा कंपनीकडून वारकऱ्यांची औषध रुपी सेवा
संगमनेर LIVE | आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपुरला पायी दिंडी व्दारे जाणाऱ्या वारकऱ्याना ऋत्वी आयुर्वेदातर्फे वारकऱ्यांना ५१ हजार रुपयांच्या औषधांचे मोफत वाटप अहमदनगर जिल्ह्यातील रुईछत्तीशी या गावी करण्यात आले.
ऊन, वारा व पाऊस यांची तमा न बाळगता पांडुरंगाच्या भेटीची आस धरुन पायी दिंडीव्दारे पंढरपुरला जाणाऱ्या वारकरी बंधुना ऋत्वी आयुर्वेदा या कंपनीने वारकऱ्यांची औषध रुपी सेवा करत ५१ हजार रुपयांच्या औषधांचे मोफत वाटप केले.
यावेळी कंपनीच्या संचालिका सौ. निकिता प्रशांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनी प्रतिनिधींनी या औषधांचे वाटप केले तसेच औषध घेण्याची पध्दत वारकऱ्यांना समजावून सांगितले. पाणी बदलामुळे वारकऱ्यांमध्ये सर्दी, डोकेदुखी, पोट साफ न होणे, घसा दुखणे, खोकला, कंबरदुखी, गुडघेदुखी यांसारखे आजार वारकऱ्यांमध्ये उद्भवण्याची शक्यता विचारात घेऊन त्या आजारांवरील औषधांचे कंपनीने वितरण केले.
उत्तम दर्जाचे औषधे पुरविणे तसेच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या ऋत्वी आयुर्वेदा कंपनीचा विस्तार झपाट्याने होत आहे. केमिकल औषधांपासून होणारे दुष्परिणाम कमी करून आयुर्वेदिक औषधांचा प्रचार व प्रसार करणे या उद्दिष्ट पूर्तीसाठी आजची वारी विशेष मोलाची ठरेल असे कंपनी प्रतिनिधी दिनकर वर्पे यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी कंपनी प्रतिनिधींचा ह.भ.प. तांबे महाराज यांनी सत्कार केला.