◻️स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
◻️विमल पान मसाला, हिरा पान मसाला व रॉयल पान मसाल्याचा समावेश
संगमनेर LIVE (नगर) | महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला ५४ हजार ४८६ रुपये किंमतीच्या गुटख्यासह मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत लिंक रोड भुषणनगर, केडगाव ता अ. नगर येथून जप्त केला असून यामध्ये विमल पान मसाला, हिरा पान मसाला, रॉयल पान मसाला यांचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेनुसार अवैध धंदयावर कारवाई करण्यासाठी नगर शहर कोतवाली पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करत असतांना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली गुटखा तंबाखुजन्य पदार्थ गौरव बत्तीन हा बिना नंबरचे लाल रंगाची डीओ मोपेड मो. सा. वरुन रंगोली हॉटेल पासुन लिंक रोडने वाहतुक करणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पथक विट भटटी जवळ, लिंक रोड भुषणनगर, ता. अ. नगर येथे सापळा लावला होता. या पथकामध्ये पोसई तुषार धाकराव, सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, पोहेकॉ मनोज गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे, पोलीस नाईक सचिन आडबल, रोहित मिसाळ, विशाल गवांदे यांचा समावेश होता.
यावेळी ठिक २२.५० वा. सुमारास एक मोपेड मो. सा. त्यावर पांढऱ्या गोण्या असलेली येतांना दिसली. त्यामुळे तिला थांबवून चालकास ताब्यात घेत त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव गौरव बत्तीन (वय २२, रा. दिल्ली गेट सातभाई मळा, अ.नगर) असे असल्याचे सांगितले. त्याला हा माल कोणाकडुन घेतला असे विचारे असता सदचा माल हा विनोद तोंडे (रा. जामखेड, जि. अ.नगर) (फरार) पुर्ण नाव पत्ता माहित नाही. असे असल्याचे सांगितले.
त्याचे ताब्यातील मोपेड मो.सा. ची झडती घेतली असता मोपेडे मो.सा. वर असलेल्या गोण्यांमध्ये प्रतिबंधीत गुटखा मिळुन आला. त्यामध्ये २० हजार ३९४ रुपये किमतीचा विमल पानमासाल्याचे १०३ सिलबंद पुडे, १ हजार ८९ रुपये किमतीचे व्हि १ तंबाखु ८६ सिलबंद पुडे, १ हजार ७६० रुपये किमतीचा हिरा पानमासाल्याचे १० सिलबंद पुडे, ४४० रूपये किमतीचा रोबॉल ७१७ कं. ची तंबाखु च्या १० सिलबंद पुडे, प कि. पो.ना./२२५१/ वाय.डी.बाट रु किमतीची एक बिना नंबरचे लाल पांढरे रंगाची डीओ मोपेड मो.स ५४,४८६ रुपये प्रमाणे वरील किमतीचा गुटखा मिळून आला.
महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली गुटखा शरीरास अपायकारक होईल असा खादय पदार्थ तो खान्यासाठी अपायकारक आहे हे माहित असतांनाही त्याची विक्री करण्याचे उद्देशाने प्रतिबंधीत गुटखा कब्जात बाळगुन वाहतुक करतांना मिळुन आला व सदर प्रतिबंधीत गुटखा हा विनोद तोंडे, रा. जामखेड, जि. अ.नगर (फरार) याचेकडुन विकत आणल्याचे सांगितले आहे.
म्हणुन पोकॉ शिवाजी अशोक ढाकणे, नेमणूक- स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर समक्ष पोलीस ठाण्यात हजर होवून सरकारतर्फे फिर्यादी होवून दोघांविरुध्द भा.द.वि. कलम ३२८, १८८, २७२, २७३ प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिली आहे आरोपी व मुद्देमाल कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिला आहे पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत
दरम्यान ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोसई तुषार धाकराव, सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, पोहेकॉ मनोज गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ढाकणे, पोलीस नाईक सचिन आडबल, रोहित मिसाळ, विशाल गवांदे यांनी केली आहे.