संगमनेर LIVE | नुकतीच संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तालुका महिला आघाडीच्या वतीने आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिक, ग्रामपंचायत व सर्व संस्थांच्या निवडणुका तसेच महिला आघाडी सक्षमीकरण आदिच्या नियोजनांसाठी आढावा बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी संघटिका शुभांगीताई पाटील यांनी मार्गदर्शन करताना आगामी निवडणुका पूर्ण ताकतीने लढण्याचे संकेत देत ज्यांनी गद्दारी केली त्या सर्व गद्दारांना गाडा व उद्धव साहेबांचे हात बळकट करा असे आवाहन केले.
यावेळी उत्तर नगर जिल्हा संपर्क संघटिका शुभदाताई शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, येणाऱ्या काळात महिला सक्षम झाल्या पाहिजे आणि महिलांना न्याय व सुरक्षा फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनाचं देऊ शकते. म्हणून येणाऱ्या निवडणुका सर्व महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढाईच्या व जिंकायच्या आहेत. शिवसेनेच्या व उद्धव साहेबांच्या पाठीशी पूर्ण ताकतीने उभं राहावे. असे त्या म्हणाल्या.
यावेळी महिला आघाडी जिल्हा संघटिका सपनाताई मोरे यांनी देखील मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मी दोन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आले हे सर्व जनतेच्या आशीर्वादामुळे झाले. तुम्ही एकाच पक्षात प्रामाणिक राहिला तर जनता, मतदार देखील तुमच्या पाठीशी उभे राहतात. पद आज आहे उद्या नाही किंवा आज छोटे पद असेल तर भविष्यात मोठे पद मिळेल परंतु, आहे त्या पक्षात एकनिष्ठ राहूनच तुम्हाला मानसन्मान मिळत असतो. यावेळी विसपुतेताई व परदेशीताई यांनी देखील मनोगत व्यक्त केले आहे.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मार्गदर्शन नियोजन, शिवसेना संगमनेर शहर प्रमुख अमर कतारी यांनी केले होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, पठार भाग तालुकाप्रमुख संजय फड, अकोले तालुकाप्रमुख मनोज मोरे, उपजिल्हाप्रमुख महेश नवले उपस्थित होते. त्याचप्रमाणे महिला आघाडी उप जिल्हा संघटिका आशा केदारी, जिल्हा सरचिटणीस सुरेखाताई गुंजाळ, महिला तालुका संघटिका शितलताई हासे, महिला शहर संघटिका संगीता ताई गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत व सत्कार केला.
याप्रसंगी संगमनेर शहर व तालुक्यातील महिला आघाडी तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.