◻️ दवाखान्यात जाऊन आस्थेवाईकपणे केली चौकशी
◻️ बुधवारी रात्री चिमुकल्या ईश्वरीवर बिबट्याने केला होता हल्ला
संगमनेर LIVE | मागील आठवड्यामध्ये खांडगाव येथील ईश्वरी विजय बालोडे या तीन वर्षीय बालिकेवर बिबट्याने हल्ला केला होता. बिबट्याच्या या हल्ल्यात जखमी झालेल्या ईश्वरीची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दवाखान्यात जाऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली.
खांडगाव शिवारात बुधवारी रात्री विजय बालोडे यांची कन्या चिमुकली ईश्वरी हीच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यांमध्ये ईश्वरी जखमी झाली होती. घाबरलेल्या लहान ईश्वरीला वडील विजय बालोडे व इतर कार्यकर्त्यांनी तातडीने मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
यानंतर ईश्वरी वर तातडीने उपचार करण्यात आले असून संगमनेर शहराच्या नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनीही तिची भेट घेऊन चौकशी केली.
यानंतर आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी मेडिकवर हॉस्पिटलमध्ये जाऊन चिमुकल्या ईश्वरीशी संवाद साधत तिची आस्थेवाईक पणे चौकशी केली. यावेळी समवेत रमेश गुंजाळ, सोमनाथ गुंजाळ, सौ. अर्चनाताई बालोडे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार थोरात यांनी मेडिकव्हर हॉस्पिटलच्या प्रशासनाला ईश्वरी च्या प्रकृतीची माहिती विचारून तिची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. आमदार थोरात यांच्या भेटीनंतर ईश्वरीचे वडील विजय बालोडे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात हे सर्वसामान्यांचे नेते आहेत. ते प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी असतात त्यांनी दिलेल्या धीरामुळे आपल्याला मोठा मानसिक आधार मिळाला असून यशोधन कार्यालयाने ही सातत्याने मदत केली असल्याचे सांगितले.