संगमनेर LIVE | आश्वी खुर्द ग्रामस्थांचे श्रध्दास्थान असलेल्या पुंजाईने श्रध्देने व उदिने अध्यात्माचा मार्ग दाखवत गावच्या अध्यात्मिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे आश्वी खुर्द ग्रामस्थांनी पुंजाई माता, प्रभु श्रीराम व दत्तमंदिराचा जिर्णोद्धार करुन सुदंर व भव्य मंदिराची उभारणी करावी. असे आवाहन हभंप भास्करगिरी महाराज यांनी केले आहे.
आश्वी खुर्द येथील ग्रामस्थांनी नुकतीच देवगड येथे जाऊन हभंप भास्करगिरी महाराज यांची भेट घेऊन पुंजाई मंदिराची संकल्पना व आराखडा कसा असेल याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना हभंप भास्करगिरी महाराज बोलत होते. याप्रसंगी देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी हभंप प्रकाशनंदगिरी महाराज देखिल उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी हभंप भास्करगिरी महाराजाना उभारण्यात येणाऱ्या मंदिराची संकल्पना सांगून मार्गदर्शन मागितले. त्यावेळी भास्करगिरी महाराजानी मंदिर जिर्णोद्धार निर्णयाचे स्वागत केले व योग्य त्या सुचना दिल्या. तसेच मंदिराचे आर्किटेक्ट हितेश सोनवणे यांचे महाराजानी कौतुक केले आहे. याप्रसंगी आश्वी खुर्दचे माजी उपसरपंच संजय गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संतोष भडकवाड, बाबासाहेब भोसले, कैलास गायकवाड, मनोज भंडारे, विजय पवार आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
आश्वी खुर्द गावच्या अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात प. पू. पुंजाई मातेचे बहुमोल असे योगदान आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या पुंजाई माता, प्रभु श्रीराम व दत्तमंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय गावातील सर्व जेष्ठ नागरिक व तरुणांनी एकत्र येऊन घेतला आहे. गावातील तरुण वर्गाने नुकतीच राज्याचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून या मंदिर जिर्णोद्धारासाठी सर्वोतोपरी निधी देऊन मदत करण्याची विनंती केली असून तरुणाचा उत्साह पाहता साहेबानी देखिल निधीसाठी तात्काळ सुचना दिल्यामुळे ग्रामस्थानी सुध्दा आता भव्य अशा मंदिर उभारणीचा निर्धार केला आहे.
संजय गायकवाड, माजी उपसरपंच आश्वी खुर्द