◻️ हिरवाई व पर्यावरण संवर्धनासाठी काम करा - सौ. दुर्गाताई तांबे
◻️ शिबलापुर येथील डोंगरावर महाविद्यालयाच्या वतीने विविध वृक्षांचे रोपण
संगमनेर LIVE | थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले दंडकारण्य अभियान हे पर्यावरण संवर्धनाचे राज्यासाठी दिशादर्शक काम ठरले आहे. हिरवी सृष्टी व पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने मूलभूत कर्तव्य म्हणून काम करावे असे आवाहन प्रकल्प प्रमुख सौ दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.
शिबलापुर येथील डोंगरावर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी समवेत प्रभारी प्राचार्य डॉ बाळासाहेब वाघ, गोरक्षनाथ पानसरे, डॉ. संजय सांगळे, नानासाहेब दिघे, डॉ. शोभा राहणे, गफ्फार शेख, बापूसाहेब पाबल, रावसाहेब नागरे, प्रवीण फटांगरे, अनिकेत वाणी यांसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडकारण्य अभियान ही मोठी लोक चळवळ ठरली आहे. मागील सतरा वर्षाच्या कामातून अनेक उघडे बोडके डोंगर हिरवेगार दिसू लागले आहे. किंबहुना पर्यावरण संवर्धन संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कामाची राज्यभर दखल घेतली गेली असून भविष्यातील पिढ्यांसाठी आपल्याला पर्यावरणाचे रक्षण केलेच पाहिजे प्रत्येकाने दरवर्षी किमान पाच वृक्ष लावून त्याचे संवर्धन केल्यास पुन्हा एकदा ही सृष्टी समृद्ध होऊन पर्यावरणाच्या समस्या करतील असेही त्या म्हणाल्या.
प्रभारी प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ म्हणाले की, थोरात महाविद्यालयाने सातत्याने दंडकारण्य अभियानासह विविध सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला आहे. शिबलापूर येथील डोंगर परिसरात केलेले वृक्ष करण्यासाठी स्थानिक विद्यार्थ्यांवर जबाबदारी दिली आहे यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण गीते गात परिसर दणाणून दिला.