संगमनेर LIVE | संगमनेर शिवसेनेच्या (ठाकरे) वतीने दुपारी १२ वाजता संगमनेर बस स्थानक समोर किरीट सोमय्या यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी व किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडी मारो आंदोलन करत काल लोकशाही न्यूजने सोमय्या यांच्या अश्लील चाळेची भांडीफोड केल्याबद्दल लोकशाही न्यूजचे आभार मानले आहेत.
यावेळी अश्लील कृत्य करणाऱ्या किरीट सोमय्यांची भाजप पक्षातून त्वरित हकालपट्टी करून त्याच्यावर योग्य ती पोलीस कारवाई करावी या हेतूने संगमनेर शिवसेनेच्या वतीने संगमनेर बस स्थानकांसमोर आज आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनप्रसंगी ठाकरे गटाचे शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या व किरीट सोमय्या यांचा निषेध व्यक्त करत त्यांची भाजप पक्षातून त्वरित हकालपट्टी करण्याची मागणी केली. उत्तर नगर जिल्हा प्रमुख मुजीब शेख यांनी देखील सदर कृत्याचा निषेध व्यक्त केला. तर तालुका प्रमुख भाऊसाहेब हासे यांनी सोमय्या दिसेल तिथे काळे फासण्याचे जाहीर केले.
यावेळी महिला आघाडीच्या तालुका संघटिका शीतल हासे, आशा केदारी, संगीता गायकवाड, वैशाली वडतल्ले यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करत सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडे मारून आपला राग व्यक्त केला. यावेळी शिवसेना युवा सेना महिला आघाडी व सर्व अधिकृत संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, पठार भाग तालुकाप्रमुख संजय फड, युवा सेना शहर प्रमुख गोविंद नागरे, अमोल डुकरे, अक्षय बिल्लाडे, शोएब शेख, ज्येष्ठ शिवसैनिक रावसाहेब गुंजाळ, विजय सातपुते, राजू सातपुते, उपशहर प्रमुख दीपक वनम, अजीज मोमीन, प्रकाश क्षत्रिय, युवा सेनेचे योगेश खेमनर, लखन सोन्नर, शिवसैनिक विकास डमाळे, शरद कवडे, सचिन साळवे, अक्षय गाडे यांनी जोरदार घोषणाबाजी केली व सोमय्याचा निषेध व्यक्त केला.