◻️ महसूल तथा पालक मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने दिव्यांग बांधवांसाठी संगमनेर येथे आयोजन
◻️ शिबाराचा दिव्यांग व्यक्तीनी लाभ घेण्याचे भारतीय जनता पक्षाचे आवाहन
संगमनेर LIVE | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने शासन आपल्या दारी उपक्रमातून जिल्हा रुग्णालयाच्या वतीने २१ जुलै २०२३ रोजी दिव्यांग बंधू आणि भगिनी साठी दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासंदर्भात तपासणी शिबिराचे संगमनेर येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती भारतीय जनता पक्षाच्या वतीने देण्यात आली.
दिव्यांग व्यक्तीना येणाऱ्या अडचणी करीता सातत्याने नगर येथे जाणे शक्य होत नाही. त्यामुळे तालुका स्तरावर शिबीराचे आयोजन करावे आशी मागणी दिव्यांग संघटनांची होती. या मागणीची दखल घेत मंत्री विखे पाटील यांनी तालुका स्तरावर या शिबीरांचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमाने साजरा व्हावा या उद्देशाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले असून, शिबीराच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीची तपासणी तसेच प्रमाणपत्र मिळण्यातील अडचणी दूर होतील या उद्देशाने तालुका स्तरावर शिबीरांचे आयोजन करण्यात आले असल्याचे भाजपाच्या वतीने सांगण्यात आले.
संगमनेर तालुक्यातील शिबीर नगरपालिकेच्या क्रडीसंकुलात संपन्न होणार असून, या शिबीरात सर्व दिव्यांगाची तपासणी करून प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
नगर जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तीना सहाय्य करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यामातून सहाय्यक साधनांचे वितरणही खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले. या शिबाराचा दिव्यांग व्यक्तीनी लाभ घेण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.