◻️ दुर्मिळ वासराला पाहण्यासाठी परिसरातून बघ्याची मोठी गर्दी
◻️ वासराला आहेत दोन डोके, चार कान, एक नाक व दोन जबडे
संगमनेर LlVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील एका शेतकऱ्याच्या दुसऱ्या वेताच्या गाईने चक्क दोन तोंड असलेल वासराला जन्म दिला आहे. या वासराचे दोन तोंड एकमेकांपासून विरुध्द दिशेला असून या वासराला चार कान, एक नाक, दोन जबडे आहेत. त्यामुळे ही बातमी परिसरात वार्यासारखी पसरल्यामुळे सर्वानी या वासराला पाहण्यासाठी एकच गर्दी केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की आश्वी बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी व दुध उत्पादक संजय अण्णासाहेब म्हसे यांची दुसऱ्या वेताच्या जर्शी गाय मंगळवार दि. १८ जुलै रोजी दुपारी १.२० मी व्याली होती. यावेळी जन्माला आलेले वासरु हे दुर्मिळ असल्याने त्याला दोन तोंड असल्याचे उपस्थिताचे लक्षात आले.
असे वासरु जन्माला येणे म्हणजे एक प्रकारे चमत्कार असून हे वासरु, जन्मानंतर अशक्त असल्याने ते जास्त काळ जगू शकेल का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. या वासराला असलेली दोन तोंडे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला आहेत. त्यामुळे आधीकच्या डोक्याचे वजन वासरु पेलू शकेल का? तसेच दोन डोक्यांचे वजन जास्त झाल्यामुळे संध्यातरी वासराला उभे राहण्यास अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. तर या वासराला चार कान, एक नाक, दोन जबडे असल्याने बघ्यानी मोठी गर्दी केली आहे.
दरम्यान अनुवांशिक विकारांमुळे तसेच हवामान आणि आईच्या जीन्स मध्ये गर्भधारणा काळात झालेल्या उलथापालथीमुळे अशी वासरे जन्माला येऊ शकता असे मत खाजगी जनावरांचे डॉ. रंगणात गिते व त्यांना फोनवरून मार्गदर्शन करणारे डॉ. फड यानी या गायीच्या प्रस्तुती नंतर मांडले आहे.