संगमनेर LIVE | लोकगीत, पोवाडे यामधून पीडित व अन्यायग्रस्तांच्या समस्यांना न्याय देत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्यंत महत्त्वाची भूमिका निभवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावे अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे.
काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अभिवादन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी समवेत कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, मातंग एकता आंदोलनाचे ज्ञानेश्वर राक्षे, प्रा. बाबा खरात, मुख्याधिकारी श्रीराम कुऱ्हे, सुरेश झावरे, दत्ता तांदळे, बाबासाहेब साळवे, जानकीराम भडकवाड, संजय जमदाडे, विराट प्रतिष्ठानचे गुलाब साळवे, संदीप आव्हाड, देवेंद्र साळवे, निलेश आव्हाड, किशोर साळवे, मनीष राक्षे, पंढरीनाथ बलसाने, सिद्धांत राक्षे, वेदांत राक्षे, सागर जमधडे, भूषण आव्हाड, विलास कवडे, तात्या कुटे, मंजाबापू साळवे, संतोष गायकवाड आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोठे योगदान दिले आहे. अण्णाभाऊ साठे यांनी ३५ कादंबऱ्या तसेच जवळजवळ अडीचशे ते तीनशे कथा लिहिलेल्या आहेत. त्यांच्या फकीरा कादंबरीला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला असून हे साहित्य केवळ मराठी भाषेत न राहता १४ भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.
वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावे ही मागणी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, आ. सत्यजित तांबे यांचे सह आपण सातत्याने केली आहे. तरी सरकारने तातडीने त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याबरोबर मातंग समाजातील विविध प्रश्न लवकरात लवकर सोडवावे अशी मागणी त्यांनी केली
कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, अण्णाभाऊंचे साहित्य हे जर्मन, इंग्रज, पोलीश ,रशियन या परकीय भाषांमध्ये सुद्धा भाषांतरित झाले आहे. जात, धर्म, देश, भाषा इत्यादी बंधनांच्या पलीकडे त्यांचे साहित्य पोहोचले आहे. समाजातील दलित व शोषितांचे प्रश्न मांडताना समतेवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी अण्णाभाऊंचे विचार आपण सर्वांनी पुढे घेऊन जावे लागतील.
ज्ञानेश्वर राक्षे म्हणाले की, कथा, कादंबऱ्या, पोवाडे यामधून समाजामध्ये जागृती निर्माण करताना मागासवर्गीय, दलित समाजाचे शोषण व त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध आवाज अण्णाभाऊंनी उठवला असून तत्कालीन परिस्थितीचे वास्तव समाजासमोर मांडले आहे. भारतरत्न पुरस्कारसाठी आपण सातत्याने सरकारकडे मागणी करत असून अ ब क ड नुसार या समाजास आरक्षण मिळावे. पार्टीच्या धरतीवर महामंडळाची स्थापना करून लहुजी साळवे यांचे स्मारकाचे काम मार्गी लावताना अण्णाभाऊंचे राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी ही त्यांनी केली.
दरम्यान याप्रसंगी प्रा. बाबा खरात यांनी अण्णाभाऊ साठे यांची विविध गीते गायली.