◻️ संगमनेर तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने प्रकाश कुलथे यांचे पत्रकारांना मार्गदर्शन
संगमनेर LIVE (योगेश रातडीया) | पत्रकारांचा लढा हा अन्यायाविरुद्ध सातत्याने सुरूच असतो. पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाज, अन्यायग्रस्त तसेच पिढीतांना न्याय देण्याचे काम करत असतो. परंतु, पत्रकार हा स्वतःच्याच न्याय हक्कापासून वंचित रहातो. पत्रकाराचे हक्क पत्रकारांना मिळालेच पाहिजे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच पत्रकारितेत झालेला बदल याबाबत त्यांनी विश्लेषणात्मक माहिती देत पत्रकारिते पुढील अनेक आव्हाने उभे राहत असल्याचे सांगून पत्रकारांचे न्याय हक्क आणि समस्या सोडवून पत्रकारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे अधिस्वीकृती समितीचे संचालक प्रकाश कुलथे म्हणाले.
संगमनेर तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना मार्गदर्शन प्रसंगी अतिथी सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रकाश कुलथे बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलथे यांची राज्य शासनाच्या महाराष्ट्र अधिस्वीकृती समितीवर नियुक्ती करण्यात आली. कुलथे शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी यावर विश्वास्थपदी कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून नासिक विभाग आणि जिल्ह्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडविले जातील. कुलथे यांची नियुक्ती झाल्याने संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र बोरसे यांनी संघटनेच्या कामाचे कौतुक केले. पत्रकार संघाचे अध्यक्ष यादवराव पावशे यांनी पत्रकार आणि समस्या बाबत माहिती दिली. आता पत्रकारच जागृत झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे ते म्हणाले संस्थापक शकील शेख यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा दिला. संघटनेचे खजिनदार योगेश रातडीया, भारत रेघाटे व संजय आहीरे यांनी मनोगत व्यक्त केले.
तसेच पुरोहीत संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी, विशाल जाखडी व त्याचे सहकारी यांनी ही प्रकाश कुलथे याचा संत्कार केला व पेटीट कनिष्ठ महाविद्यालयाचे इन्चार्ज गुलाब गायकवाड व प्रा. शशांक गंधे यांनीही कुलथे याचा सत्कार केला.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू शेख यांनी केले तर, आभार सुशांत सातपुते यांनी मानले. यावेळी पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत महाले, ज्येष्ठ पत्रकार वसंत बंदावणे, किशोर डोंगरे, संजय अहिरे, जिजाबा हासे, किशोर कालडा, सलीम शेख, लियाकत पठाण, प्रसाद सुतार, योगेश रातडिया, दिघे, दत्ता घोलप, रामा लोखंडे, आनंद समुद्र, ओंकार सस्कर आदी उपस्थित होते. याप्रसंगी संघटनेमध्ये नव्याने काही पत्रकारांनी सदस्य स्वीकारले त्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.