◻️ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या संगमनेर शाखेचा उपक्रम
संगमनेर LIVE (संजय गोपाळे) | महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई संगमनेर शाखेच्या वतीने पत्रकारांसाठी दुचाकी व चार चाकी वाहनांच्या चालक परवाना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पत्रकार हा नेहमीच धावपळीच्या युगात जगत असताना स्वतःची काळजी हे नेहमीच बाजूला ठेवून दुसऱ्यासाठी धडपडत असतो. परंतु त्याच्या पाठीमागे त्याचे कुटुंब हे खंबीरपणे उभे असते. त्याच्या कुटुंबाची व स्वतःची काळजी व सुरक्षतेसाठी वाहन परवाना हा त्याच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे.
परंतु, आर्थिक समीकरण व कायमच धावपळीत असल्याने वाहन परवाना हा अतिशय महत्त्वाचा विषय असतो. म्हणूनच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने नेहमीच पत्रकारांच्या हितासाठी सामाजिक भाग म्हणून ज्या पत्रकारांचे वाहन चालन परवाना काढणे बाकी आहे. त्यांच्यासाठी संघटनेच्या वतीने अतिशय अल्प दरात (शासकीय दरात) लायसन्स कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक १९ जुलै रोजी सकाळी १० वाजता वडगाव (पान) तळेगाव फाटा या ठिकाणी संघटनेतील पत्रकारांसाठी सरकारी दरामध्ये दुचाकी व चार चाकी लायसन्स कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या पत्रकार बांधवांकडे चार चाकी व दुचाकी वाहनांचे लायसन्स नाही त्यांनी दोन दिवसात आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, बोनाफाईड किंवा शाळा सोडल्याचा दाखला व दोन पासपोर्ट साईज फोटो घेऊन राज्य पत्रकार संघाचे सचिव अमोल मतकर यांच्याकडे दोन दिवसात जमा करावे . असे आव्हान महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संजय गोपाळे व उपाध्यक्ष स्वानंद चत्तर यांनी केले आहे.
दरम्यान या परवाना शिबीराप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष प्रा. अनिल राहणे, अहमदनगर जिल्हा सचिव चंद्रकांत झुरंगे, जिल्हा निवड समितीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे हे मान्यवर उपस्थित राहणार असून सर्व पत्रकार बांधवांनी या सामाजिक योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.