◻️ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संगमनेर येथे शिबिराचे आयोजन
संगमनेर LIVE | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने दिव्यांग व्यक्तीसाठी भारतीय जनता पक्ष आणि दिव्यांग सारथी संघटनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या तपासणी शिबीरात ५४२ दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात आली यापैकी ३५२ व्यक्तिंना प्रमाणपत्रासाठी पात्र ठरविण्यात आले. तर १९२ दिव्यांग व्यक्तींना पुढील तपासणीसाठी नगर येथील जिल्हारुग्णालयात तपासणीचा सल्ला देण्यात आला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढदिवसाच्या निमित्ताने सेवाभावी उपक्रम आयोजित करण्याच्या केलेल्या आवाहानानूसार भारतीय जनता पक्ष आणि दिव्यांग सारथी संघटनेच्या माध्यमातून या तपासणी शिबीराचे आयोजन शहरातील क्रीडा संकुलात करण्यात आले होते.
अहमदनगर जिल्हा रूग्णालय, पद्मश्री डॉ. विखे पाटील फौडेंशनचे दिव्यांग केंद्र आणि जनसेवा फौंडेशन यांचे सहकार्य या शिबीरासाठी लाभले. क्रिडासंकुलात दिव्यांग व्यक्तीची नोंदणी तपासणी असे स्वतंत्र विभाग करण्यात आले होते. दिव्यांग व्यक्तीची तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. यासाठी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. गोकुळ घोगरे, डॉ. अशोक कराळे, डॉ. प्रशांत तांडे, डॉ. साजिद तांबोळी, डॉ. मिनल कोठवळ, डॉ. विश्वनाथ गुरवाळे, डॉ. प्रशांत निर्मळ यांच्यासह वैद्यकीय पथकाने आलेल्या दिव्यांग व्यक्तींची तपासणी केली.
प्रारंभी शिबीराचे औपचारीक उद्घाटन दिव्यांग मुलांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे शहर अध्यक्ष अॅड श्रीराम गणपुले, अमोल खताळ, दादासाहेब गुंजाळ, वैभव लांडगे, भगवान गिते, दिव्यांग सारथी संघटनेचे विनायक दाभोळकर, बापु देशमुख, प्रविण शेपाळ, रोहिदास साबळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. रायगड येथे नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.