अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा हवामान खात्याचा इशारा

संगमनेर Live
0
◻️ नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन

संगमनेर LIVE (अहमदनगर) | भारतीय हवामान खात्‍याने जिल्हयात २१ ते २२जुलै २०२३ या कालावधीमध्ये गडगडाटी वादळासह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वाऱ्यासह पाऊस होण्‍याची शक्‍यता वर्तविलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगत आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. धोकादायक ठिकाणी सेल्‍फी काढू नये. गडगडाटीच्‍या वादळादरम्‍यान व वीजा चमकतांना कोणत्‍याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्‍वजांचे खांब, विद्युत, दिव्‍यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉंन्‍सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्‍या अधांतरी लटकणा-या, लोंबणाऱ्या केबल्‍स् पासून दूर रहावे.

वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्‍यास सुरक्षेसाठी गुडघ्‍यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्‍ही गुडघ्‍यांच्‍यामध्‍ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्‍थलांतर करावे.

नागरीकांनी वादळी वारे, वीज आणि पाऊस यापासून स्‍वत:सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्‍य ती दक्षता घ्‍यावी. आपत्‍कालीन परिस्थितीत नजीकच्या तहसील कार्यालय, पोलीस स्‍टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्‍हा नियंत्रण कक्ष, जिल्‍हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दुरध्‍वनी क्र. १०७७ (टोल फ्री), ०२४१ - २३२३८४४ वा २३५६९४० वर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !