◻️ आरोपींमध्ये संगमनेर येथिल दोन तर कोपरगाव तालुक्यातील दोघाचा समावेश
◻️ आरोपींकडून १८ लाख १६ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
◻️ त्या सराईत गुन्हेगारावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गंभीर ११ गुन्हे दाखल
संगमनेर LIVE | प्रशांत साळवे (वय- ३६), धंदा नोकरी, शाखा प्रबंधक बॅक ऑफ महाराष्ट्र वाकोडी फाटा, अहमदनगर यांचे बॅक ऑफ महाराष्ट्र वाकोडी फाटा येथील एटीएम जवळ दोन अनोळखी इसमांनी त्यांचेकडील विना नंबर कारमध्ये येवुन गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशिन कट केले. यावेळी मशिनमधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याच्या तक्रारी वरुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गु.र.नं. ४२६/२०२३ भादविक ३७९, ५११, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ही घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्ह्याचा तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.
त्यामुळे पोलीस निरदिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई तुषार धाकराव, सोपान गोरे, सफौ बाळासाहेब मुळीक, अतुल लोटके, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, संदीप दरदंले, भिमराज खर्से, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, पोकॉ सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, अमृत आढाव, बाळु गुंजाळ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, सफौ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ बबन मखरे, पोना ज्ञानेश्वर शिंदे, चापोहेकॉ संभाजी कोतकर व अरुण मोरे यांची दोन पथके नेमुण गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.
त्यामुळे या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी बॅक ऑफ महाराष्ट्रा येथील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशिन कट करुन चोरी करणारे रेकॉर्ड वरील आरोपींचा राहुरी परिसरात शोध घेताना पथकास एक सिल्व्हर रंगाची स्विफ्ट कार भरधाव वेगाने जाताना दिसली. पथकाने संशयीत भरधाव कारची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिल्यानंतर त्यांनी पथकाला कारचा पाठलाग करण्यास सांगितले तर दुसरे पथकास नगर मनमाड रोडने जावुन कारचा शोध घेण्यास सांगितले होते.
पथक एमआयडीसी, विळद परिसरात संशयीत वाहनाचा शोध घेताना सदर वाहन बायपास रोडने जाताना दिसले. पथकाने खातगांव टाकळी गांवचे शिवारात ताब्यातील वाहन स्विफ्ट कारला आडवे लावुन थांबबली व कार मधील दोन संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे अजित ठोसर (वय २२, रा. मातकुळी, ता. आष्टी, जिल्हा बीड हल्ली रा. पंम्पींग स्टेशन, साईनगर, ता. संगमनेर) व जमीर पठाण (वय २१, रा. खांडगांव, ता. संगमनेर) असे सांगितले. यावेळी कारची झडती घेतली असता कारमध्ये ऑक्सीजन सिलेंडर, भारतगॅस कंपनीची टाकी, पेंट स्प्रे, गॉगल, स्टील रॉड, निळे व लाल रंगाचा पाईप, रेग्युलेटर, नोझल, ऍ़डजस्टेबल पक्कड व ओप्पो कंपनीचा मोबाईल मिळुन आल्याने त्या बाबत विचारपुस केली. मात्र सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले पण अधिक सखोल विचारपुस केल्यानंतर त्यांनी त्यांचे साथीदार रविंद्र चव्हाण व शुभम मंजुळे दोन्ही रा. खडकी, ता. कोपरगांव यांचे सोबत मिळुन चोरी केल्याची माहिती दिली. त्यामुळे त्यांना ताब्यात घेतले व आरोपींचे साथीदाराचा शोध घेत रविंद्र चव्हाण (वय - ३२) व शुभम मंजुळे (वय - २५) दोन्ही रा. खडकी, ता. कोपरगांव असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या चारही आरोपीस आणखी कोठे कोठे व किती ठिकाणी चोरीचे गुन्हे केले याबाबत पोलिसांनी विचारपुस केल्यानंतर त्यांनी भिंगार, राहुरी, जिल्हा अहमदनगर, वैजापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, सातारा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर व अंभोरा, जिल्हा बीड परिसरात चोरी केल्याची कबुली दिली. तर विविध ठिकाणी यांच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तसेच आरोपी अजित ऊर्फ कमळ्या ठोसर हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे ११ गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी नामे रविंद्र चव्हाण हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे दरोडा, जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे १६ गुन्हे दाखल आहेत.
ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींचे कब्जातुन १८ लाख १६ हजार ५०० रुपये किंमतीची दोन मंहिंद्रा ट्रॅक्टर, एक स्विफ्ट कार, एक बुलेट, एक पल्सर मोटार सायकल व चोरीसाठी आवश्यक साधने अशा मुद्देमालासह ताब्यात घेवुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर व उविपोअ अनिल कातकाडे, व उविपोअ संदीप मिटके यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.